राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या वावड्या गेल्या आठवड्यात उठल्या होत्या. अजित पवार हे भाजपसोबत सत्ता स्थापन करणार आहेत. त्यांच्यासोबत 40 आमदार असल्याचंही सागितलं जात होतं. स्वत: अजित पवार यांनी मीडियासमोर येऊन या चर्चांमध्ये काहीच तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं.
हेही वाचा… शरद पवारांच्या भेटीसाठी उदय सामंत ‘सिल्व्हर ओक’वर, नेमकं चाललंय काय?
मी शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादीतच राहणार असल्याचंही अजितदादांनी स्पष्ट केलं. त्यानंतर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. मात्र, या चर्चा पूर्णपणे थांबलेल्या नाहीत. आता भाजपच्या एका खासदाराने एक मोठं विधान केलं आहे. शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच संजय राऊत हे अजित पवार यांना महाविकास आघाडीतून बाहेर काढतील, असा दावा या भाजप खासदाराने केला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
हेही वाचा… राष्ट्रवादीच्या शिबिराला अनुपस्थित का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी मीडियाशी संवाद साधताना हा खळबळजनक दावा केला आहे. संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार ते शरद पवार यांच्या सांगण्यावरूनच अजित पवार यांना महाविकास आघाडीमधून बाहेर काढतील. शिवसेनेतील 40 आमदार संजय राऊत यांना कंटाळून गेले. अजितदादा पवार हे सुद्धा संजय राऊत यांना कंटाळूनच महाविकास आघाडी सोडून जातील. महाविकास आघाडी फुटण्यास संजय राऊतच जबाबदार राहतील. तशी त्यांची थोरवी मोठी आहे. शिवसेना फोडण्यातही त्यांचाच मोठा वाटा आहे. राऊतांनीच 40 आमदारांना घराच्या बाहेर काढलं, असं विधान अनिल बोंडे यांनी केलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
Read also
हेही वाचा…पुण्यात शरद मोहोळ यांच्या पत्नीचा भाजपात प्रवेश, राजकीय वर्तुळात खळबळ
हेही वाचा… ‘मविआ’त फूट; काँग्रेस, राष्ट्रवादीचा ठाकरे गटाला मोठा धक्का
हेही वाचा… शरद पवार आणि गौतम अदानींची भेट; अजित पवारांचे सूचक वक्तव्य
हेही वाचा… कोण संजय राऊत? अजित पवारांनी संजय राऊतांना दाखवला आरसा