मराठा आरक्षणासंदर्भात जो काही निकाल आला, त्याबाबत सरकारने त्यांच्या विधी व न्याय खात्याला तज्ज्ञ लोकांना, विरोधी पक्षाला विश्वासात घेऊन यावर तातडीने काय करता येईल यावर विचार केला पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नमूद केले. तसेच कोणावर अन्याय होऊ नये याची खबरदारी घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
हेही वाचा… राज ठाकरेंना मोठा धक्का! ‘या’ नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
अजित पवार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. तुम्ही बोलल्यानंतरही संजय राऊत सल्ले देत आहेत, त्यांची मतं मांडतायत, असा सवाल त्यांना पत्रकार परिषदेदरम्यान विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्यांनी कोण संजय राऊत असे म्हणत टोलाही लगावला. मी कोणाचेही नाव घेतलेले नव्हते. कुणाच्या अंगाला का लागावे? मी आमचा पक्ष आणि आमच्यापुरतं बोललो होतो, असेही ते म्हणाले. निवडणुका होण्याची चिन्हे आहेत, या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, मी निवडणूक अधिकारी नाही. जेव्हा निवडणूक अधिकारी होईन तेव्हा मी नक्की सांगेन की निवडणुका कधी होतील. फेब्रुवारी २०२२ मध्ये निवडणुका होणार होत्या. त्यावेळी अनेक इच्छूकांनी तयारी केली.
तेव्हा अनेक इच्छुकांनी निरनिराळ्या पद्धतीनं आपलं मार्केटिंग केलं, जाहिरतबाजी केली, कामं केली, देवदर्शन केली, झाली का निवडणूक? आता ते बिचारे कंटाळून गेले केव्हा निवडणूक लागते हा विचार करून. त्यामुळे जेव्हा निवडणूक लागेल तेव्हा बसू, चर्चा करू, महाविकास आघाडीच्या संदर्भात काय भूमिका घ्यायची, कोणाला उमेदवारी द्यायची, मागच्या महापालिकेच्या निवडणुकांमध्ये मविआच्या घटकपक्षांचे किती नगरसेवक आले हे पाहून पुढील भूमिका ठरवू, असंही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा… अजित पवारांच्या खुलाश्यानंतरही शरद पवारांची सावध भूमिका; प्रत्येक आमदाराला फोन…
तसेच राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचे भावी खासदार म्हणून उल्लेख असलेले बॅनर झळकले होते. त्यावर बोलताना अजित पवार म्हणाले, प्रशांतला माझ्या शुभेच्छा, असा टोला लगावत ते पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यात ते कुठले भावी खासदार कुठले हे स्पष्ट केलेले नाही, असेही अजित पवार म्हणाले.
Read also
हेही वाचा… शरद पवारांच्या भेटीसाठी उदय सामंत ‘सिल्व्हर ओक’वर, नेमकं चाललंय काय?
हेही वाचा… राष्ट्रवादीच्या शिबिराला अनुपस्थित का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
हेही वाचा… ‘गुण आणि तिथी जुळेल, लग्नही धडाक्यात होईल’; पाटलांचे अजितदादांबाबत सूचक विधान
हेही वाचा… “अजितदादांनी जरी खुलासा केला असला तरी, योग्यवेळी राष्ट्रवादीतून बाहेर पडतील”