गेल्या अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपासोबत जाणार, अशा चर्चा खूपच रंगल्या होत्या. मात्र आज खुद्द अजित पवारांनी माध्यमांसमोर येत मी कायम शरद पवारांच्यामार्गदर्शनात राष्ट्र्वादीतच राहणार असल्याचे स्पष्ट केले.
हेही वाचा… अजित पवारांनी बोलवली महत्त्वाची बैठक; राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते देवगिरी बंगल्यावर ..!
विशेष म्हणजे, अजित पवार हे राष्ट्रवादी सोडून भाजप किंवा शिवसेनेत आलेत तर त्यांचे स्वागत आहे. मात्र राष्ट्रवादीचा गट घेऊन ते भाजपसोबत जाणार असतील तर आम्ही सत्तेतून बाहेर पडू, असा इशारा शिवसेनेचे प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट यांनी अजितदादांच्या खुलास्यापूर्वी दिला होता. मात्र अजितदादांनी खुलासा केल्यानंतर शिरसाट यांनी आणखी शंका व्यक्त केली आहे.
अजित पवारांच्या खुलास्यानंतर संजय शिरसाट यांनी वेगळीच शंका व्यक्त केली आहे. संजय शिरसाट म्हणाले की, आम्ही कुठलेही राजकीय करताना शांत डोक्याने करत असतो. मी त्यावेळी केवळ जर आणि तरची भाषा वापरली. आम्ही म्हणालो की, अजित पवार आले तर आम्ही स्वागत करू. त्यांना राष्ट्रवादी नसेल सोडायची तर तो त्यांचा प्रश्न आहे.
ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’चा रोख पवारांच्या घरातल्या भांडणावर होता. त्यामुळे अजितदादांनी संजय राऊतांवर आगपाखड केली. संजय राऊत यांना अजितदादांनी चांगलेच फटकारले. अजित पवारांबद्दल बोलायचा अधिकार संजय राऊतला कोणी दिला. संजय राऊत ठरवणार का? अजित दादांनी काय केलं पाहिजे काय करू नये. म्हणूनच अजित दादांनी आज सडकून उत्तर दिले. खरे पाहता अजितदादांना उद्धव ठाकरेंचे नेतृत्व मान्यच नाही. आज त्यांनी जरी खुलासा केला असला तरी, योग्यवेळी ते निर्णय घेतील. ते नक्कीच राष्ट्रवादीतून बाहेर पडतील. आणि त्यानंतर संजय राऊत शुद्धीवर येतील, असे शिरसाट म्हणाले.
Read also
हेही वाचा… राज ठाकरेंना मोठा धक्का! ‘या’ नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
हेही वाचा… अजित पवारांच्या खुलाश्यानंतरही शरद पवारांची सावध भूमिका; प्रत्येक आमदाराला फोन…
हेही वाचा… “अजित पवारांच्या स्क्रिप्टचे रायटर फडणवीस”; सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट
हेही वाचा… भावी खासदार राष्ट्रवादीचा? पुण्यात पुन्हा बॅनरबाजी..!