पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची पत्नी स्वाती मोहोळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप नेते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह माजी महापौर आणि भाजप प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ आणि शहराध्यक्ष जगदीश मुळीक यावेळी उपस्थित होते. परंतु शरद मोहोळच्या पत्नीने भाजपमध्ये प्रवेश केल्याने पुणे शहराच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा… राष्ट्रवादीच्या शिबिराला अनुपस्थित का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं
कोथरुड मधील स्वारद फाउंडेशनच्या अध्यक्षा स्वाती मोहोळ यांचा आज भाजपामध्ये प्रवेश झाला. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देश झपाट्याने प्रगती करत आहे. त्यामुळे आज देशातील प्रत्येकाचा भाजपावर अढळ विश्वास आहे. या पक्षात गुणवत्तेला नेहमीच प्राधान्य मिळते. त्यामुळे सामाजिक क्षेत्रातील अनेक कार्यकर्ते आज माननीय मोदीजींच्या नेतृत्वात भाजपामध्ये काम करण्यासाठी इच्छूक आहेत. काही दिवसांपूर्वी श्याम देशपांडे यांचा मुंबईत प्रवेश झाला. आजही स्वाती मोहोळ यांच्या माध्यमातून जो प्रवेश होत आहे, त्यामुळे कोथरुडमधील आजच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढेल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, महिला मोर्चा अध्यक्षा अर्चना पाटील, कोथरुड मंडल अध्यक्ष पुनित जोशी, श्याम देशपांडे, यांच्या सह भाजपाचे सर्व पदाधिकारी आणि नगरसेवक उपस्थित होते.
कोथरुड मधील स्वारद फाउंडेशनच्या अध्यक्षा स्वाती मोहोळ यांचा आज भाजपामध्ये प्रवेश झाला.
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देश झपाट्याने प्रगती करत आहे. त्यामुळे आज देशातील प्रत्येकाचा भाजपावर अढळ विश्वास आहे. या पक्षात गुणवत्तेला नेहमीच प्राधान्य… pic.twitter.com/NGCX52XWoA
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) April 20, 2023
Read also
हेही वाचा… ‘मविआ’त फूट; काँग्रेस, राष्ट्रवादीचा ठाकरे गटाला मोठा धक्का
हेही वाचा… शरद पवार आणि गौतम अदानींची भेट; अजित पवारांचे सूचक वक्तव्य
हेही वाचा… कोण संजय राऊत? अजित पवारांनी संजय राऊतांना दाखवला आरसा
हेही वाचा… शरद पवारांच्या भेटीसाठी उदय सामंत ‘सिल्व्हर ओक’वर, नेमकं चाललंय काय?