मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फोनवरून एका महिलेला शिवीगाळ केली असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये संबंधित महिलेचे नाव स्वप्ना पाटकर असून संजय राऊतांसोबत त्या क्लिपमध्ये त्यांचा संवाद असल्याचा सांगण्यात येत आहे. या संदर्भात भाजप नेते निलेश राणे यांनी देखील ट्विट केलं असून संजय राऊतांवर आता भाजपकडून जोरदार टिका केली जात आहे.
“बाळासाहेबांचा नातू, उद्धव ठाकरेंचा पुतण्या शिंदेंच्या भेटीला”; राजकीय वर्तुळात एकच चर्चा
संजय राऊत एक विकृत माणूस आहे, हे काय लपून राहिलेलं नाही. 70 सेकंड मध्ये 27 शिव्या देण्याचा विक्रम संजयच्या नावाने कोरावा लागेल. हे प्रकार फक्त धमकी देऊन थांबले नसतील तर त्यामागे त्या महिलेला दिलेला त्रास व पुरावे यांची पोलिसांनी आणि महिला आयोगाने गंभीर दखल घ्यावीच लागेल, अशी टीका भाजप नेते निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर केली आहे.
“त्यामुळे ओबीसी हा सत्तेच्या अन् प्रशासनाच्या बाहेर फेकला जाईल”; शरद पवारांना चिंता
सर्वज्ञानींचे अभिजात मराठी १७ सेकंदात २७ शिव्या वर्ल्ड बुक ऑफ गिनीज मध्ये नोंद व्हायला हरकत नाही असा टोला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर लगावला आहे. यामुळे आता संजय राऊत या क्लिप संदर्भात काय स्पष्टीकरण देणार याकडे लक्ष असणार आहे. या क्लिपमुळे राऊत यांच्यावर राज्यातील लोकांकडून जोरदार टीका केली जात आहे. यातच शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
“उद्या जरी निवडणुका लागल्या तर आम्ही तयार”;शरद पवार
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचीही राज्यात जोरदार चर्चा सुरू आहे. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी-गुजराथी समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे. जर गुजराती माणूस मुंबई सोडून गेला तर मुंबईला आर्थिक राजधानी कोणीही म्हणणार नाही, असं वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोशारी यांनी केले आहे. त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. राज्यातील अनेक नेत्यांकडून या राज्यपाल कोश्यारी यांच्या या वक्तव्याचा निषेध केला जात आहे.
संजय राऊत एक विकृत माणूस आहे हे काय लपून राहिलेलं नाही. 70 सेकंड मध्ये 27 शिव्या देण्याचा विक्रम संजयच्या नावाने कोरावा लागेल. हे प्रकार फक्त धमकी देऊन थांबले नसतील तर त्यामागे त्या महिलेला दिलेला त्रास व पुरावे याची पोलिसांनी आणि महिला आयोगाने गंभीर दखल घ्यावीच लागेल. pic.twitter.com/5xnSEYIQjk
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) July 30, 2022
सर्वज्ञानींचे अभिजात मराठी… १७ सेकंदात २७ शिव्या…
वर्ल्ड बुक ऑफ गिनीज मध्ये नोंद व्हायला हरकत नाही… @rautsanjay61— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 30, 2022
Read also
- “दिल्लीतील बॉसना खुश करण्याचा राज्यपालांनी चांगला चंग बांधलाय”; राष्ट्रवादीचा भाजपला टोला
- “नको त्या गोष्टीत राज्यपालांनी नाक खुपसू नये”; मनसेचा राज्यापालांना इशारा
- “मराठी अस्मितेला डिवचण्याचा प्रयत्न केला तर…;” राज्यपालांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून रोहित पवारांचा इशारा
- जिद्द बाळगणाऱ्या ३१४ अपंगांना लक्ष्मण जगताप व बंधू शंकर जगताप यांचा हात मदतीचा; कृत्रिम हात व पायाचे मोफत वाटप
- एकाच नाण्याच्या दोन बाजू; अन् आदित्य ठाकरेंनी अजान सुरू असताना थांबवले भाषण