मुंबई : महाराष्ट्रात शिवसेनेतील पडलेली फुट रोखण्यासाठी शिवसेनेचे युवा नेेते आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेदरम्यान बंडखोर नेत्यांच्या मतदारसंघात भेट देत आहेत. शिवसेनेतुन बंड केलेल्या आमदारांवर शिवसेनेतील नेते जोरदार टीका करत आहेत. याच निष्ठा यात्रेदरम्यान मुंबईमध्ये आदित्य ठाकरे यांचं भाषण सुरू असताना अचानक अजान सुरू झाली यावेळी आदित्य ठाकरे यांनी आपलं भाषण थांबवले असल्याचे समोर आले आहे. अजान पुर्ण होईपर्यत भाषण थांबवले होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे भाषण चालु असताना अजान सुरू झाली असताना राज ठाकरे यांनी हे लवकर थांबवा अशा शब्दात पोलिस अधिकाऱ्यांना सुनावले होते. त्या भाषणा आधी राज ठाकरे यांनी भोंगे खाली उतरवण्यात यावेत यासाठी राज्यात आंदोलने केली आहेत. तर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी अजान चालु असताना थोडा वेळ भाषण थांबवले आहे. ठाकरेंमधील याच वेगळेपनाची चर्चा सध्या राज्यात होत आहे.
“आता फक्त उद्धव ठाकरेंसाठी काम करणार”; शिक्षकांनी सेनेसाठी दिला राजीनामा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 1 मे 2022 रोजी झालेल्या मनसेच्या मेळाव्यात मशिदींवरील भोंगे हटवण्याची मागणी मनसेने केली होती. पहाटे मोठ्या आवाजात होणारी अजान बंद करण्यात यावी, मशिदीवरील लाऊड स्पिकर खाली उतरवण्यात यावेत अशी भुमिका मनसेने घेतली होती. यासाठी मनसेकडून ठिकठीकाणी आंदोलने केरण्यात आली होती. मनसेच्या आंदोलनानंतर राज्यातील अनेक मशिदीवरील भोंगे खली उतरवण्यात आले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीलाही दे धक्का..
बाळासाहेब ठाकरे यांनीही मशिदिवरचे भोंगे खाली उतरवण्यात यावेत यासाठी आवाज उठवला होता. परंतु शिवसेनेची सत्ता आली तरी या बाबत कोणतीही भुमिका शिवसेनेकडून घेतली गेली नव्हती. तर राज ठाकरे यांनी या बाबत सरकारला इशारा दिला होता. राज ठाकरे यांनी सरकारला दिलेल्या वेळेनंतर अजान सुरू असेल त्या ठिकाणी हनुमाण चालीसा लावणार असल्याचं सांगितले होते. राज्यात अनेक ठीकाणी अजान सुरू असताना हनुमाण चालिसा लावण्यात आली होती.
Read also
- “बाळासाहेबांचा नातू, उद्धव ठाकरेंचा पुतण्या शिंदेंच्या भेटीला”; राजकीय वर्तुळात एकच चर्चा
- “त्यामुळे ओबीसी हा सत्तेच्या अन् प्रशासनाच्या बाहेर फेकला जाईल”; शरद पवारांना चिंता
- “उद्या जरी निवडणुका लागल्या तर आम्ही तयार”;शरद पवार
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा महाराष्ट्र दौरा; आदित्य ठाकरेंना देणार टक्कर ?
- “वाह रे भाजप, कुणी बार चालवतंय, तर कुणी कुंटणखाना”; राष्ट्रवादीचा भाजपवर निशाणा