मुंबई : एकनाथ शिंदे यांनी राज्यात सत्तानाट्यामुळे शिवसेनेत फुट पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कर्यकर्त्यांना आपल्या गटात घेत आहेत. तर शिवसेनेला पुन्हा ताकद देण्यासाठी आदित्य ठाकरे राज्यात शिवसंवाद यात्रा करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदित्य ठाकरे यांच्या पावलावर पाऊल ठेवत शिवसेना टिकवण्यासाठी मैदानात उतरले आहेत.
“महाराष्ट्रात लवकरच सत्तांतर होईल”; संजय राऊतांचे भाकित
शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे शिवसेना टिकवण्यासाठी राज्यात शिवसंवाद यात्रा काढत आहेत. तर आदित्य ठाकरे यांनी ज्या ज्या भागात दौरा केला आहे त्या भागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दौरा करणार आहेत. त्यामुळे शिंदे आणि ठाकरे यांच्यातील राजकीय लढाई अजुन तीव्र होणार असल्याचं दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिपदानंतरचा हा राज्यातील पहिलाच दौरा असणार आहे.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षणाची आज सोडत; वाचा सविस्तर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथुन तीन दिवसीय दौरा करणार आहेत. विकास प्रकल्पांचे सादरीकरण तसेच कामांचा आढावा आणि उद्घाटन करणार आहेत. यानंतर ते पत्रकार परिषदही घेणार आहेत. मालेगाव हा शिवसेनेचा बंडखोर आमदार दादाजी भुसे यांचा मतदारसंघ आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मालेगावमध्ये सभा घेणार आहेत. त्यानंतर औरंगाबाद मध्ये आमदार सुहास कांदे यांची भेट घेणार आहेत.
“संजय राऊत काय आहे,? हे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांना माहिती आहे”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शिवसेनेचे नेते जोरदार टीका करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीतही शिंदे यांच्या वर जोरदार टीका केली होती. शिवसेना आपलं राजकीय वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत आहे. आदित्य ठाकरे यांनी आपल्या यात्रेचा पहिला टप्पा भिवंडीतून सुरू केला तर या यात्रेचा टप्पा शिर्डित संपावला होता. नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद या जिल्ह्यात आदित्य ठाकरे यांनी दौरे केले होते. तर या दौऱ्यात आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली.
Read also
- “वाह रे भाजप, कुणी बार चालवतंय, तर कुणी कुंटणखाना”; राष्ट्रवादीचा भाजपवर निशाणा
- मुंबईत बसून उंटावरुन शेळ्या हाकणाऱ्यांनी..; अजित पवारांनी थेट बांधावरून मुख्यमंत्र्यांना खडेबोल सुनावले
- “आता फक्त उद्धव ठाकरेंसाठी काम करणार”; शिक्षकांनी सेनेसाठी दिला राजीनामा
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीलाही दे धक्का..
- “ते दिवस रात्र स्वप्न पाहतात, त्यांना स्वप्नात राहु द्या,”शिंदेंचं राऊतांना प्रत्युत्तर