पुणे : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर सेनेला उतरती कळा लागली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याने अनेकांची हाकालपट्टी केली जात आहे तर अनेक जण शिंदे गटात सामील होत आहे. मात्र असं असताना देखील उद्धव ठाकरे यांना अनेक जण पाठिंबा देत आहेत. यातच आता पुण्यातील एका प्राथमिक शिक्षकाने आपल्या शिक्षक पदाला रामराम ठोकत पुढील आयुष्य उद्धव ठाकरे यांच्यासाठी देण्याचं ठरवलं आहे. त्याची चर्चा सध्या खुप सुरू आहे.
“मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी सारखं दिल्लीला जावं लागत, ही फार मोठी शोकांतिका”
पुणे जिल्ह्यातील वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेड संचलित संस्थेमधील दिपक खरात यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांनी या संस्थेत जवळपास 1 फेब्रुवारी 2002 पासून सेवा बजावत होते. त्यानंतर आता त्यांनी प्राथमिक शिक्षण विभागातून बाहेर पडत त्यांनी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी जवळपास 20 वर्ष सेवा केली आहे. त्यांनी यासंदर्भात राजीनाम्यात उद्धव ठाकरे यांचा उल्लेख देखील केला आहे.
“स्मृती ताई, नको त्या विषयावर बेंबीच्या देठापासून बोलतात”
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवत शिवसेना या पक्ष संघटनेचे पूर्णवेळ काम करण्यासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. 27 जुलै 2022 रोजी त्यांनी आपल्या पदाच्या राजीनाम्यात म्हटलं आहे. त्यामुळे दिपक खरात यांच्या राजीनाम्याची चर्चा चांगलीच रंगली असून राज्याच्या राजकारणात पहिलाच शिक्षक आहे की ज्यांनी पक्षाच्या सेवेसाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
Read also
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीलाही दे धक्का..
- “ते दिवस रात्र स्वप्न पाहतात, त्यांना स्वप्नात राहु द्या,”शिंदेंचं राऊतांना प्रत्युत्तर
- “महाराष्ट्रात लवकरच सत्तांतर होईल”; संजय राऊतांचे भाकित
- पुणे महापालिका निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षणाची आज सोडत; वाचा सविस्तर
- “संजय राऊत काय आहे,? हे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांना माहिती आहे”