मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून माझा आवाज दाबण्यासाठीच प्रयत्न सुरू आहे. परंतु माझा आवाज त्यांना दाबता येणार नाही. मी काय आहे हे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांना माहिती आहे. माझ्यावर कितीही दबाव आला तरी संजय राऊत गुडघे टेकणार नाही. असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यांना पत्रावळ चाळ प्रकरणी इडीने दुसऱ्यांचा समन्स पाठवले होते.
“उद्धव ठाकरेंनी नगरसेवक, आमदारकीसाठी उभं राहावं अन् निवडून दाखवावं”; दिपक केसरकर
एकनाथ शिंदे यांच्या सरकारबाबत संजय राऊत म्हणाले की, सत्तांतराच्या मताशी मी ठाम आहे. कदाचित माझं स्वप्न असेल. प्रत्येकाचं स्वप्न असतं. कुणाला मिळेल त्या मार्गाने मुख्यमंत्री व्हायचं असतं. आम्हाला महाराष्ट्रात सत्ता आणायची आहे. पण मिळेल त्या मार्गाने नाही. लोकांमध्ये जाऊन आणि लोकशाही मार्गाने सत्ता आणू असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्र्यांचा निकाल लावला आता पक्षाचाही लावतील; विखे पाटलांचा राऊतांवर निशाणा
एकनाथ शिंदे यांचा उद्यापासून महाराष्ट्र दौरा करणार आहे. ते राज्यातील विविध भागांतील पुरग्रस्त भागांची पाहणा करणार आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याचा दौरा करणं चांगली गोष्ट आहे. राज्या महापुर आहे. 100 लोकांचा बळी गेला. गुरंढोरं वाहून गेली. अजून राज्यात मंत्रिमंडळाची स्थापना झाली नाही. दिल्लीच्या वाऱ्या आणि फेऱ्या वाढल्या आहेत. यातून मार्ग काढून मुख्यमंत्री दौरा काढत असतील तर चांगलं आहे. असा टोला देखील त्यांनी लगावला.
“धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरेंना शोभत नाही, लॉलीपॉप वगैरे चिन्ह देऊन टाका”
एकनाथ शिंदे यांनी अलिकडेच शिंदे गटातील काही नेत्यांची पुन्हा नियुक्ती केली आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले की, कोणत्या नियुक्त्या? शिवसेना इथेच आहे. कोणत्या आणि कोणत्या पक्षाच्या नियुक्त्या करत आहेत. त्यांना अधिकार काय भातुकलीचा पोरखेळ सुरू आहे. त्याकडे आम्ही गांभीर्याने पाहत नाही. असा टोला देखील त्यांनी लगावला.
Read also
- “मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी सारखं दिल्लीला जावं लागत, ही फार मोठी शोकांतिका”
- “स्मृती ताई, नको त्या विषयावर बेंबीच्या देठापासून बोलतात”
- एकनाथ शिंदे यांचे झंझावत दौरे; 30 जुलैपासून संपुर्ण महाराष्ट्र फिरणार
- सर्वोच्च न्यायालयाने आनंदावर पाणी फेरलं; आगामी काही निवडणुकां ओबीसी आरक्षणाशिवाय
- शिंदे गटाला मोठा धक्का! बंडखोर खासदाराच्या घटस्फोटीत पतीचा शिवसेनेत जाहीर प्रवेश