परभणी : शिवसेनेचे माजी खासदार सुरेश जाधव यांनी राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिला आहे. वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. याआधी सुरेश जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेतली होती. त्यामुुळे सुरेश जाधव आता शिंदे गटात सामिल होणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. मुख्यमंत्रा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसोबतच आता राष्ट्रवादीलाही धक्का दिला आहे.
“स्मृती ताई, नको त्या विषयावर बेंबीच्या देठापासून बोलतात”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेतील अनेक नेत्यांना आपल्या गटात सामिल करून घेत आहेत. राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष तथा माजी खासदार सुरेश जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली. या भेटीनंतर सुरेश जाधव हे शिंदे गटात सामिल होणार असल्याची चर्चा सुरू असताना त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उपाध्यक्ष पदाचा राजिनामा दिला. मात्र राष्ट्रवादीतुन बाहेर पडल्यानंतर जाधव यांनी आपण वैयक्तीक कारणामुळे उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असल्याचं म्हटले.
एकनाथ शिंदे यांचे झंझावत दौरे; 30 जुलैपासून संपुर्ण महाराष्ट्र फिरणार
मुख्यमंत्री यांच्या भेटीविषयी विचारले असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी या साठी घेतली असल्याचं म्हणाले. पुराच्या पाण्यामुळे शेतातील जमीन खरडून गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शिंदे सरकारणे त्वरित मदत करावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पत्र दिले आहे, असं सुरेश जाधव म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाने आनंदावर पाणी फेरलं; आगामी काही निवडणुकां ओबीसी आरक्षणाशिवाय
राष्ट्रवादी पक्षाचे उपाध्यक्ष तथा शिवसेनेचे माजी खासदार सुरेश जाधव व माजी जिल्हाप्रमुख भास्कर लंगोटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर सुरेश जाधव यांनी आपल्या राष्ट्रवादी उपाध्यक्ष पदाचा राजिनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिला आहे. त्यामुळे सुरेश जाधव आता शिंदे गटात सामिल होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read also
- “ते दिवस रात्र स्वप्न पाहतात, त्यांना स्वप्नात राहु द्या,”शिंदेंचं राऊतांना प्रत्युत्तर
- “महाराष्ट्रात लवकरच सत्तांतर होईल”; संजय राऊतांचे भाकित
- पुणे महापालिका निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षणाची आज सोडत; वाचा सविस्तर
- “संजय राऊत काय आहे,? हे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांना माहिती आहे”
- “मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी सारखं दिल्लीला जावं लागत, ही फार मोठी शोकांतिका”