मुंबई : काॅंग्रेस नेता अधीर रंजन चौधरी यांनी काल द्रौपदी मुर्मू यांचा उल्लेख राष्ट्रपत्नी असा केल्याने भाजपने आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे काल लोकसभेत मोठा गदारोळ बघायला मिळाला. भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्यावरून काॅंग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. यावर आता राष्ट्रवादीने देखील यामध्ये उडी घेतली आहे.
पुणे महापालिका निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षणाची आज सोडत; वाचा सविस्तर
केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांची मूलगी गोव्यात बिअर बार चालवत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यावरून देखील राज्यातील तसेच देशातील काॅंग्रेस नेत्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच मेघालय मध्ये भाजपचे नेते बनार्ड मराक यांच्या घरीहून काही स्फोटक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच त्याच ठिकाणी ते वेश्याव्यवसाय चालवत असल्याचीही माहिती समोर आली आहे. यावरून देखील राष्ट्रवादीने त्यांच्यावर निशाणा साधला.
“संजय राऊत काय आहे,? हे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांना माहिती आहे”
वाह रे भाजप, कुणी बार चालवतंय. तर कुणी कुंटणखाना. तरी बी आम्हाला पार्टी विथ डिफरन्स म्हणा मित्रों, और ये गोलाबारूद चीन को मुॅंहतोड जवाब देने के लिए जमा किया है क्या? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. यावरून रूपाली पाटील यांनी देखील त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
“मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी सारखं दिल्लीला जावं लागत, ही फार मोठी शोकांतिका”
काँग्रेस खासदार बंगाली असल्याने चुकून राष्ट्रपती ऐवजी राष्ट्रपत्नी शब्द बाहेर पडले. तात्काळ काँग्रेस खासदारने माफी दिलगिरी व्यक्त केली, पण कधीही विकासाची कामे न करणारी भाजप नेहमी प्रमाणे धर्म,जात,पात नामांतर या विषयावर ,सभागृहात गोंधळ घालून पावन झाली. स्मृती ताई नको त्या विषयावर बेंबीच्या देठापासून ,नुसते आरोप करण्याचे काम दिल्ली पासूनच ट्रेनिंग दिले असल्याचे जाणवते असंही रूपाली पाटील यांनी म्हटलं आहे.
वाह रे भाजप!
कुणी बार चालवतंय,
तर कुणी कुंटणखाना,
तरी बी आम्हाला पार्टी विथ डिफरन्स म्हणामित्रों, और ये गोलाबारूद चीन को मुँहतोड जवाब देने के लिए जमा किया है क्या?#BernardMarak #MeghalayaBJP@BJP4India pic.twitter.com/isI2GHLZNr
— NCP (@NCPspeaks) July 29, 2022
Read also
- मुंबईत बसून उंटावरुन शेळ्या हाकणाऱ्यांनी..; अजित पवारांनी थेट बांधावरून मुख्यमंत्र्यांना खडेबोल सुनावले
- “आता फक्त उद्धव ठाकरेंसाठी काम करणार”; शिक्षकांनी सेनेसाठी दिला राजीनामा
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीलाही दे धक्का..
- “ते दिवस रात्र स्वप्न पाहतात, त्यांना स्वप्नात राहु द्या,”शिंदेंचं राऊतांना प्रत्युत्तर
- “महाराष्ट्रात लवकरच सत्तांतर होईल”; संजय राऊतांचे भाकित