मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला मोठा खिंडार पडला आहे. अनेक सेनेचे नेते कार्यकर्ते, पदाधिकारी हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत आहेत. मात्र आता बाळासाहेब ठाकरे यांचे नातू असलेले निहार ठाकरे हे सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होणार असल्याची चर्चा सुरू आहे. आज निहार ठाकरे यांनी आज एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
निहार ठाकरे यांचं एलएलएमपर्यंत शिक्षण झालं आहे. त्यांनी आपल्या वकिली व्यवसायात जम बसवला आहे. निहार ठाकरे यांचे वडिल बिंदुमाधव यांचं 1996 मध्ये अपघातात मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनानंतर बाळासाहेबांना मोठा धक्का बसला होता. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जयदेव ठाकरे हे निहार यांचे सख्खे काका आहेत. तर राज ठाकरे हे त्यांचे काका आहे. ठाकरे कुटुंब महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठ नाव आहे.
“आता फक्त उद्धव ठाकरेंसाठी काम करणार”; शिक्षकांनी सेनेसाठी दिला राजीनामा
मागच्याच वर्षी निहार ठाकरे यांचं लग्न भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील हिच्यासोबत झाला. त्या सध्या जिल्हा परिषद सदस्य़ा आहेत. अंकिता पाटील आणि निहार ठाकरे यांचा विवाह 2021 मध्ये मुंबईत मोठ्या थाटात पार पडला होता. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आता आदित्य ठाकरे हे राजकारणात सक्रिय झाले आहेत. तसचे आता राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे देखील राजकारणाच्या मैदानात उतरलेले आहेत.
Read also
- “फिल्टर असुन देखील गावात दुषीत पाणी;” अन् अजित पवारांनी केला त्या गावाचा दौरा
- “त्यामुळे ओबीसी हा सत्तेच्या अन् प्रशासनाच्या बाहेर फेकला जाईल”; शरद पवारांना चिंता
- “उद्या जरी निवडणुका लागल्या तर आम्ही तयार”;शरद पवार
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा महाराष्ट्र दौरा; आदित्य ठाकरेंना देणार टक्कर ?
- “वाह रे भाजप, कुणी बार चालवतंय, तर कुणी कुंटणखाना”; राष्ट्रवादीचा भाजपवर निशाणा