सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या मत मोजणीला सुरुवात झाली आहे. यामध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीच्या पॅनलचे प्रमुख सतिश सावंत पराभूत झाले आहेत. सावंत आणि विठ्ठल देसाई यांना समान मते पडली होती.
त्यानंतर चिठ्ठी टाकण्यात आली त्यामध्ये सतिश सावंत यांना पराभवचा धक्का बसला. तर विठ्ठल देसाई विजयी झाले आहेत. मनिष दळवी वेंगुर्लामधून विजयी झाले आहेत. भाजपला ४ जागा आणि महाविकास आघाडीला आता पर्यंत ४ जागा मिळाल्या आहेत. भाजपचे सिद्धिविनायक पॅनेलच आणि महाविकास आघाडीचे सहकार समृद्धी पॅनेल यांच्यात ही निवडणूक होत आहे.
तिसरी लाट भयानक रूपात येऊ शकते, कृपा करून निर्बंध पाळा; महापौर पेडणेकरांचे नागरिकांना आव्हान
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा बँक पंचवार्षिक निवडणुकीसाठी आठही तालुका तहसील कार्यालयात मतदान केंद्र ठेवण्यात आली होती. मतदानासाठी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दोन्ही बाजूकडून निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली होती. त्यामुळे दोन्ही पॅनेलने तगडे उमेदवार देत एकमेकांसमोर तगडे आवाहन उभे केले आहे. मतमोजणी केंद्रावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणामुळे ही निवडणूक जास्तच चेर्चेत आली होती.
केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 19 जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीत 39 दिग्गज उमेदवार रिंगणात आहेत. 981 मतदारांपैकी 968 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे 98.76 टक्के मतदान झाले आहे.
Read also:
- ‘रिमोट कंट्रोल’ने फोन केला आणि विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली!
- हुर्ररररर… हवेतच; बैलगाडा शर्यत सुरू करण्याला पुन्हा ब्रेक?
- कोल्हापुरातील अदानी-अंबानी जोडगोळीपासून सावधान राहा; खासदार मंडलिकांची मुश्रीफ, बंटी पाटलांवर नाव न घेता टीका
- “सरकारमधून बाहेर पडून भाजपसोबत सत्तास्थापनेसाठी चढाओढ”; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट
- मोठी बातमी: नितेश राणे यांना धक्का, अटकपुर्व जामीन न्यायालयाने फेटाळला