मुंबई : देशभरात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीने चांगलेच थैमान घातले आहे. आता पुन्हा एकदा कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन हा उच्छाद मांडण्यास सुरुवात करताना दिसत आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त रुग्ण ओमायक्रॉनचे सापडले आहेत. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत शाळा, कॉलेजेस, चित्रपटगृहे आणि काही गोष्टी बंद करण्यात आल्या आहेत.
राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार वादात काँग्रेसची उडी; बाळासाहेब थोरातांनी केलं मोठं विधान
महाराष्ट्रात मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसांपासून हजारोंच्या संख्येत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. यासंदर्भात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पत्रकार परिषद घेत याबद्दल माहिती दिली आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग हा वाढत आहे. ओमायक्रॉनचा संसर्ग हा कोरोनाच्या संसर्गापेक्षा तिप्पट असू शकतो अशी शक्यता आहे. त्यामुळे आता नागरिकांनी कृपा करून निर्बंधांचे पालन करावे. दोन वर्षांमध्ये नागरिकांना लॉकडाऊनमुळे मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. त्यामुळे आम्हालाही लॉकडाऊन जनतेवर थोपवायचे नाही.
भाजप आमदाराच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मोठी दुर्घटना; शॉक लागून चार कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू
लोक आता लॉकडाउनला कंटाळलेले आहेत हे आम्हालाही माहित आहे. मात्र नागरिकांनी आता सावधान होणे गरजेचे आहे. मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये जवळपास ४ हजारांच्यावर कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तसेच ओमायक्रॉनचे देखील रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आता नागरिकांनी लसीकरचा लाभ घ्यावा आणि सरकारला सहकार्य करावे अशी भूमिका महापौर किशोरी पेडणेकर मांडली आहे. मुंबईमध्ये ३१ डिसेंबरच्या धर्तीवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुंबईतच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात देखील नववर्षाच्या सुरुवातीला निर्बंध लागले आहेत आणि जर परिस्थिती बिकट झाली तर हे निर्बंध कठोर होऊ शकतात.
Read also:
- सिंधुदुर्ग जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष; नारायण राणेंची प्रतिष्ठा पणाला
- केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या कुटुंबियांच्या पाठीशी मी भक्कमपणे उभा आहे; फडणवीसांची रोखठोक भूमिका
- नितेश राणेंना जामीन मिळणार की पुन्हा अटक? आज होणार अंतिम फैसला
- माझ्यामुळं राष्ट्रवादीने एकदा पराभव चाखला, त्यामुळेच मला जाणूनबुजून अडकवलं जातंय – गोपीचंद पडळकर
- १०० कुत्री मिळून एकट्या वाघाची शिकार करु शकत नाहीत; मुंबईत राणे समर्थकांची बॅनरबाजी