सिंधुदुर्ग : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 19 जागांसाठी तब्बल 39 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 30 डिसेंबरला होणाऱ्या या निवडणुकीत 19 पैकी 18 प्रभागात एकास एक तर कुडाळ तालुका शेती संस्थांमधून भाजपचे उमेदवार सुभाष मडव यानी बंडखोरीचे रणशिंग फुंकल्याने तिरंगी लढत आहे. तर 31 डिसेंबरला जिल्हा बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे स्वतः लक्ष घालून आहेत. केंद्रात नारायण राणेंना मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांच्यासाठी स्थानिक पातळीवरील ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे बँकेची ही निवडणूक नारायण राणेंसाठी प्रतिष्ठेची समजली जात आहे.
अखेर ठरलं! विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आता पुढच्याच वर्षी…
जिल्हा बँकेचे विद्यमान चेअरमन आणि महाविकास आघाडीचे पॅनेल प्रमुख सतीश सावंत हे शेती संस्था मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरुद्ध भाजपच्यावतीने विठ्ठल देसाई रिंगणात आहेत. नागरी सहकारी संस्था, नागरी पतपुरवठा संस्था, पगारदार नोकरांच्या संस्था मतदारसंघातून जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली आणि कणकवलीचे नगरसेवक सुशांत नाईक यांच्यात लढत होत आहे.
“मुख्यमंत्री येणार हे लिहून देऊ का?”, असे म्हणणाऱ्या अजित पवारांचा शब्द मुख्यामंत्र्यांनी फोल ठरवला?
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी 19 संचालकपदासाठी 91 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यामधून 22 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे कुडाळ वगळता सर्व ठिकाणी चुरशीची लढत होत आहे. कुडाळ शेती उत्पादन मतदारसंघातून प्रकाश मोर्ये (भाजप), सुभाष मडव (भाजप) तर महाविकास आघाडीचे विद्या प्रसाद दयानंद बांदेकर अशी तिरंगी लढत होत आहे. या तिरंगी लढतीमुळे शेती उत्पादनाच्या मतदारसंघात भाजपासाठी डोकेदुखी ठरू शकते.
“मला आत्महत्या कराविशी वाटते”… आणि शिवसेनेच्या ‘त्या’ आमदाराला विधानसभेतच रडू कोसळले.
महिला प्रतिनिधी मतदारसंघातून होणाऱ्या या लक्षवेधी निवडणुकीत कणकवलीत प्रज्ञा ढवण ,अस्मिता बांदेकर (भाजप) विरुद्ध कुडाळ येथील नीता राणे व सावंतवाडीच्या अनारोजी लोबो (महाविकास आघाडी) यांच्यात लढत होणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मतदारसंघातून महाविकास आघाडीचे आत्माराम ओटवणेकर विरुद्ध भाजपचे सुरेश चौकेकर यांच्यात लढत होणार आहे.
खासदार सुप्रिया सुळेंना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना टेस्ट करुन घेण्याचं आवाहन
इतर मागास मतदारसंघातून होणाऱ्या लढतीत भाजपचे रवींद्र मडगावकर विरुद्ध महाविकास आघाडीचे मनिष पारकर यांच्यात लढत होणार आहे. विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातून भाजपचे गुलाबराव चव्हाण आणि महाविकास आघाडीचे मेघनाथ धुरी यांच्यात लढत होत आहे.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार? शिवसेना खासदार संजय राऊतांच मोठं विधान
जिल्हा बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष सुरेश दळवी पणन संस्था शेती प्रक्रिया संस्था ग्राहक सहकारी शेती संस्था या मतदारसंघातून उभे असून भाजपचे विद्यमान संचालक अतुल काळसेकर यांच्यात लक्षवेधी लढत होणार आहे. औद्योगिक सहकारी मजूर संस्था जंगल कामगार संस्था मोटर वाहतूक संस्था या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे लक्ष्मण उर्फ बाबा आनंद आंगणे विरुद्ध भाजपाचे गजानन गावडे यांच्यात लढत होत आहे.
राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार वादात काँग्रेसची उडी; बाळासाहेब थोरातांनी केलं मोठं विधान
मच्छिमार सर्व दूध संस्था कुकूटपालन वराह पालन जनावरे पैदास संस्थांमधून महाविकास आघाडीचे एम. के. गावडे विरुद्ध भाजपचे महेश सारंग यांच्यात लढत होत आहे. विणकर घरबांधणी देखरेख संस्था मतदार संघातून महाविकास आघाडीचे विनोद रामचंद्र मर्गज विरुद्ध भाजपचे संदीप परब यांच्यात लढत होत आहे. सर्व बिगर सहकारी संस्था मतदारसंघातून भाजपचे समीर रमाकांत सावंत विरुद्ध महाविकास आघाडीचे विकास सावंत यांच्यात लढत होणार आहे.
Read also:
- केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या कुटुंबियांच्या पाठीशी मी भक्कमपणे उभा आहे; फडणवीसांची रोखठोक भूमिका
- नितेश राणेंना जामीन मिळणार की पुन्हा अटक? आज होणार अंतिम फैसला
- माझ्यामुळं राष्ट्रवादीने एकदा पराभव चाखला, त्यामुळेच मला जाणूनबुजून अडकवलं जातंय – गोपीचंद पडळकर
- १०० कुत्री मिळून एकट्या वाघाची शिकार करु शकत नाहीत; मुंबईत राणे समर्थकांची बॅनरबाजी
- भाजप आमदाराच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मोठी दुर्घटना; शॉक लागून चार कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू