अमरावती : अमरावतीत माजी राज्यमंत्री व भाजपाचे आमदार प्रवीण पोटे यांच्या पोटे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गेटचे रंगकाम करताना चार कर्मचाऱ्यांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झालाय. धक्कादायक बाब म्हणजे या घटनेला चार तास उलटूनही कोणीही मृतदेह पहायला व नातेवाईकांचे सांत्वन करण्यासाठी आलं नाही असा आरोप मृतांच्या नेतेवाईकांनी केलाय. मरण पावलेल्या चारही कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात कॉलेज प्रशासनाविरुद्ध रोष व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांच्या खरमरीत पत्रावर राज्यपाल कोश्यारींची तीव्र शब्दात नाराजी; उद्धव ठाकरे म्हणतात…
कॉलेजमध्ये शिपाई पदावर असतांना कलरिंगचे काम कसे देण्यात आलं?, असा प्रश्न मरण पावलेल्या कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाने विचारलाय. या घटनेची सखोल चौकशी करण्यात यावी व याप्रकरणी दोषीवर कारवाई करण्यात यावी तसेच मृत कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना नोकरी व आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयातून ताब्यात घेणार नाही व शवविच्छेदन करू देणार नाही असा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.
राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लावण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे संकेत; दोन दिवसांत होणार निर्णय
दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनी रुग्णालयामध्ये जाऊन घटनेची माहिती घेत नातेवाईकांचे सांत्वन केले. तर मागण्या पूर्णपणे मान्य होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा दिल्याने वातावरण तापले आहे. दुपारी या ठिकाणी पोलीस दाखल झाले असून तणाव निर्माण झाला आहे. यासंदर्भात कॉलेज प्रशासनाने कोणतेही स्पष्टीकरण दिलेलं नाही.
Read also:
- राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार वादात काँग्रेसची उडी; बाळासाहेब थोरातांनी केलं मोठं विधान
- राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार? शिवसेना खासदार संजय राऊतांच मोठं विधान
- खासदार सुप्रिया सुळेंना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना टेस्ट करुन घेण्याचं आवाहन
- विद्यापीठ कायद्याबद्दल विरोधकांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न; मंत्री उदय सामंताचे प्रत्यूत्तर
- नाव उदय, पण यांनी शिक्षणाचा अस्त केला; विद्यापीठ विधेयकावरून सुधीर मुनगंटीवारांचा हल्लाबोल