मुंबई : आठवण ठेवा. सरकार नाय बरखास्त केलं तर नाव बदलून ठेवा असा इशारा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काल विधानसभेत दिला होता. या आधीही भाजप नेत्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागणार असल्याची विधानं केली होती. या सर्व विधानांचा शिवसेना नेते संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाषा करणारे मूर्ख आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांवर घणाघाती हल्ला चढवला.
ठाकरे सरकारकडून आता विद्यापीठांनाही राजकारणाचा अड्डा बनवाण्याचा घाट घातला जातोय; फडणवीस आक्रमक
राष्ट्रपती राजवटीची चर्चा कोण करतय माहीत नाही. अशी चर्चा करणारे मूर्ख आहेत. राज्यात पूर्ण बहुमताचं सरकार आहे. 170 आमदारांचा पाठिंबा आहे. अशा किरकोळ गोष्टींवर राष्ट्रपती राजवट लावण्याची कुणी भाषा करत असेल तर त्यांनी देशाची घटना वाचून घ्यावी, असा टोला राऊतांनी लगावला आहे.
अर्धा गुंठा, एक गुंठा जागेवरील अतिक्रमण कारवाई तात्काळ थांबवा – आमदार महेश लांडगे
यावेळी त्यांनी राज्यपालांच्या पत्रावरही भाष्य केलं. राज्यपाल सदगृहस्थ आहेत. ते अनेक वर्ष राजकारणात आहेत. संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी सेवा केली आहे. ते एका राज्याचे मुख्यमंत्रीही होते. कालच मला ते एका लग्न सोहळ्यात भेटले. आम्ही गप्पा ही मारल्या. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. त्यांच्यावर कोणीही दबाव आणू शकत नाही. राज्यघटनेचं पालन करणारं प्रमुख पद त्यांच्याकडे आहे. ते राज्यात आल्यापासून आम्ही त्यांचा आदरच करतो. त्यांचा अनादर व्हावा असं कृत्य आम्ही केलं नाही. मुख्यमंत्री आणि राज्यातील कोणत्याही मंत्र्याने ते केलं नाही. राजभवनावर गेल्यावर ते प्रेमाणे आदर सत्कार करतात. ते वडीलधारे आहेत. पण त्यांच्यावर दबाव कोण आणतं ते त्यांनी स्पष्ट सांगितलं पाहिजे. ते सांगितलं असतं तर बरं झालं असतं, असा टोला त्यांनी राज्यपालांना लगावला.
Read also:
- खासदार सुप्रिया सुळेंना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना टेस्ट करुन घेण्याचं आवाहन
- विद्यापीठ कायद्याबद्दल विरोधकांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न; मंत्री उदय सामंताचे प्रत्यूत्तर
- नाव उदय, पण यांनी शिक्षणाचा अस्त केला; विद्यापीठ विधेयकावरून सुधीर मुनगंटीवारांचा हल्लाबोल
- राज्यात पुन्हा कठोर निर्बंध लावण्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे संकेत; दोन दिवसांत होणार निर्णय
- मुख्यमंत्र्यांच्या खरमरीत पत्रावर राज्यपाल कोश्यारींची तीव्र शब्दात नाराजी; उद्धव ठाकरे म्हणतात…