सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यात शिवसैनिक संतोष परब हे जबर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांनी या हल्ल्याबद्दल आमदार नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.
खासदार सुप्रिया सुळेंना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना टेस्ट करुन घेण्याचं आवाहन
नितेश राणे यांचा कार्यकर्ता गोट्या सावंत आणि आणखी एका आरोपीस या संदर्भात अटक करण्यात आली आहे. नितेश राणे यांच्या जामिनावर अत्यंत महत्वाची सुनावणी काल होत असताना ते या सुनावणीलाही गैरहजर राहिले आहे. सरकारी वकील यांनी युक्तिवाद करत असताना म्हटलं आहे की आरोपींच्या बाजूने पोलीस प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर नितेश राणेंना अटक केली तर मोर्चा काढू अशी वक्तव्य केली जात आहेत. नितेश राणेंच्या पीएने म्हणजेच राकेश परबने या प्रकरणातील आरोपी सचिन सातपुतेला ३३ वेळा फोन केले आहेत.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार? शिवसेना खासदार संजय राऊतांच मोठं विधान
एवढंच नाही तर सचिन सातपुते आणि नितेश राणे यांचे एकत्रित असलेले काही फोटो देखील कोर्टात सादर करण्यात आले आहेत असं सरकारी वकील ऍड. प्रदीप घरत यांनी म्हटलं आहे. सरकारी वकील घरत यांनी केलेल्या युक्तिवादात नितेश राणे, गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात यावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर जिल्हा प्रधान सत्र न्यायाधीश हांडे यांनी ३० डिसेंबर रोजी निकाल देणार असल्याचे सांगितले आहे.
Read also:
- माझ्यामुळं राष्ट्रवादीने एकदा पराभव चाखला, त्यामुळेच मला जाणूनबुजून अडकवलं जातंय – गोपीचंद पडळकर
- १०० कुत्री मिळून एकट्या वाघाची शिकार करु शकत नाहीत; मुंबईत राणे समर्थकांची बॅनरबाजी
- भाजप आमदाराच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मोठी दुर्घटना; शॉक लागून चार कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू
- भाजप आमदाराच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मोठी दुर्घटना; शॉक लागून चार कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू
- राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार वादात काँग्रेसची उडी; बाळासाहेब थोरातांनी केलं मोठं विधान