मुंबई : संतोष परब हल्लाप्रकरणानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींचे पडसाद आता मुंबईतही उमटायला सुरुवात झाली आहे. एकीकडे कणकवली पोलिसांनी सिंधुदुर्गातील राणे समर्थकांची धरपकड सुरु केली आहे. त्याचवेळी मुंबईत राणे समर्थकांचे बॅनर्स झळकले आहेत. मुंबईच्या दादर परिसरात संकेत बावकर या राणे समर्थकाकडून बॅनर्स लावण्यात आले आहेत. १०० कुत्री मिळून एकट्या वाघाची शिकार करु शकत नाही. वाघ हा वाघच असतो, असा मजकूर या बॅनर्सवर लिहला आहे. मुंबईच्या इतर भागांमध्येही राणे समर्थक असे बॅनर्स लावू शकतात. त्यामुळे मुंबईतही आता शिवसेना विरुद्ध राणे असा सामना रंगण्याची शक्यता आहे.
नाव उदय, पण यांनी शिक्षणाचा अस्त केला; विद्यापीठ विधेयकावरून सुधीर मुनगंटीवारांचा हल्लाबोल
सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात सध्या नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनाच्या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. त्याचवेळी पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस पाठवून खळबळ उडवून दिली आहे. याशिवाय, नितेश राणे यांचे स्वीय सहायक राकेश परब आणि वेंगुर्ला तालुका प्रमुख मनीष दळवी यांनाही पोलिसांनी नोटीस पाठवल्या आहे. या सगळ्यांकडे नितेश राणे यांच्या ठावठिकाण्याविषयी माहिती असू शकते. त्यामुळे पोलिसांकडून या तिघांची चौकशी होऊ शकते.
विद्यापीठ कायद्याबद्दल विरोधकांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न; मंत्री उदय सामंताचे प्रत्यूत्तर
दरम्यान, कणकवली पोलिसांनी नारायण राणे यांना दुपारी तीन वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, नारायण राणे याठिकाणी आलेले नाहीत. त्यामुळे आता पोलीस त्यांच्या घरी जाऊन घरावर नोटीस चिकटवतील, असे सांगितले जात आहे. नारायण राणे हे केंद्रीय मंत्री असल्यामुळे पोलीस त्यांच्यावर थेट कारवाई करु शकत नाहीत. त्यामुळे नारायण राणे आणि भाजपकडून आता या सगळ्याला कशाप्रकारे प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
Read also:
- भाजप आमदाराच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मोठी दुर्घटना; शॉक लागून चार कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू
- भाजप आमदाराच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मोठी दुर्घटना; शॉक लागून चार कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू
- राज्यपाल विरुद्ध ठाकरे सरकार वादात काँग्रेसची उडी; बाळासाहेब थोरातांनी केलं मोठं विधान
- राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार? शिवसेना खासदार संजय राऊतांच मोठं विधान
- खासदार सुप्रिया सुळेंना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना टेस्ट करुन घेण्याचं आवाहन