मुंबई – राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यापासूनच विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळालं आहे. गेल्या ८ दिवसांपासून ही निवडणूक कधी होणार? याच अधिवेशनात होणार का? कशी होणार? राज्यपालांची मंजुरी कधी मिळणार? अशा अनेक मुद्द्यांवरून तर्क-वितर्क सुरू होते.
मात्र, अखेर याबाबतचा निर्णय झाला असून विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आता पुढील वर्षी मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. यासंदर्भात कालपासून पडद्यामागूनही अनेक घडामोडी घडत असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आज राज्यपालांनी राज्य सरकारला पत्राद्वारे उत्तर दिलं आणि सगळी सूत्र फिरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नितेश राणेंना अटक होणार? मंत्री नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया…म्हणाले…
यंदाच्या अधिवेशनातच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्यासाठी २८ डिसेंबर अर्थात मंगळवारचा दिवस देखील नक्की करण्यात आला होता. त्यानुसार मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून राज्य सरकारने निवडणूक घेण्यासाठी मंजुरीचा प्रस्ताव देखील सोमवारी राज्यपालांना पाठवला होता. मात्र, त्यावर राज्यपालांची मंजुरी मिळालेली नव्हती. त्यामुळे नेमकी निवडणूक होणार की नाही? याविषयी चर्चा सुरू झाली होती. राज्य सरकारला राज्यपालांच्या उत्तराची प्रतिक्षा असताना अखेर दुपारी राज्यपालांनी पत्राद्वारे राज्य सरकारला उत्तर पाठवलं आहे.
राज्यपालांनी आपल्या पत्रामध्ये नेमक्या कोणत्या मुद्द्यांचा समावेश केला, याविषयी अद्याप माहिती समोर आलेली नसली, तरी बंद लिफाफ्यामध्ये राज्य सरकारला पाठवलेल्या या पत्रामध्ये राज्यपालांनी या निवडणुकीसाठी नकारात्मकच प्रतिसाद दिल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर हालचाली सुरू झाल्या आणि ही निवडणूक थेट पुढच्या वर्षी होणार असल्याचं समोर आलं आहे.
Read also:
- ‘कॉक कॉक कॉक कॉक…, बाबा मला वाचव’; शिवसेनेच्या मोर्चात नितेश राणेंविरोधात घोषणाबाजी
- “बाबा मला वाचवा म्हणत नितेश राणे लपून बसलेत”, शिवसेना आमदार वैभव नाईक यांचा टोला
- अरे बाबा ती मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे, तेवढी तरी राहू दे; अजितदादांनी टोचले आमदारांचे कान
- “कुत्री, मांजरं, कोंबड्यांचं आपण प्रतिनिधित्व करत नाही याचं भान ठेवा”; अजित पवारांनी खडसावलं
- नितेश राणे कुठेयं, हे मी का सांगू? मुलाच्या अटकेच्या भीतीने नारायण राणे घाबरले?