सिंधुदुर्ग – जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख असलेले शिवसैनिक संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर रोजी झालेल्या हल्ला प्रकरणावरुन राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. या हल्ल्यामागे भाजपाचे आमदार नितेश राणे असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जातोय. या प्रकरणामधील प्रमुख आरोपी असणाऱ्या सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीमधून ताब्यात घेतलं असून सातपुते हा स्वत: नितेश राणे समर्थक असल्याचं सांगितलं जातं. या प्रकरणामध्ये राज्याच्या विधानसभेपासून अगदी कणकवलीपर्यंत सत्ताधारी आणि विरोधक भाजपा आमने-सामने आल्याचं चित्र पहायला मिळतंय. शिवसेनेनं या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कणकवली पोलीस स्थानकावर सोमवारी मोर्चा काढला.
“सरकार हरवलं आहे”चा सदरा परिधान करत मंगेश चव्हाणांची आघाडी सरकारवर टीका
या आंदोलनाच्या वेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नितेश राणेंना संतोष परब यांच्या मारहाण प्रकरणामध्ये अटक करण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी, ‘कॉक कॉक कॉक कॉक…, बाबा मला वाचव’ यासारख्या घोषणाही दिल्या. शिवसैनिकांच्या या आंदोलनामुळे कणकवलीमधील राजकीय वातावरण तापलंय.
नितेश राणेंना “म्याव म्याव” प्रकरण चांगलंच भोवलं; भास्कर जाधवांकडून निलंबनाची मागणी
हा मोर्चा आणि एकंदरितच या विषयावरुन कणकवलीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक पक्षांमध्ये सुरु असणारी धुसपूस या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. ही बैठक वरिष्ठ पोलीस उपअधीक्षक कार्यालयामध्ये पार पडली. या बैठकीला वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. या बैठकीला राज्याचे अपर पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यासारखे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये नक्की काय निर्णय झाला याची माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
Read also:
- “बाबा मला वाचवा म्हणत नितेश राणे लपून बसलेत”, शिवसेना आमदार वैभव नाईक यांचा टोला
- अरे बाबा ती मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे, तेवढी तरी राहू दे; अजितदादांनी टोचले आमदारांचे कान
- “कुत्री, मांजरं, कोंबड्यांचं आपण प्रतिनिधित्व करत नाही याचं भान ठेवा”; अजित पवारांनी खडसावलं
- नितेश राणे कुठेयं, हे मी का सांगू? मुलाच्या अटकेच्या भीतीने नारायण राणे घाबरले?
- विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट; शरद पवारांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन