विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशीच्या सुरुवातीलाही विरोधकांकडून पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती. यावेळी आमदार नितेश राणेदेखील इतर भाजपा आमदारांसोबत आंदोलनात सहभागी झाले होते. भाजपा आमदारांकडून पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी केली जात असताना शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे सभागृहात पोहोचले. यावेळी नितेश राणे यांनी म्याव म्याव असा आवाज देण्यास सुरुवात केली. त्यानंतर आता सत्ताधारी महाविकास आघाडीने यावरुन नितेश राणे यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली.
“आगामी पुणे महापालिका निवडणुकीत भाजपा किमान १२० जागी विजयी होणार!”
नितेश राणेंनी केलेल्या कृत्यावरुन याआधीही विधासभेत चर्चा घेण्यात आली होती. त्यावेळी भाजपा नेत्यांनीही हे बरोबर नसल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता पुन्हा शिवसेनेकडून नितेश राणे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. सोमवारी विधानसभेत आमदार भास्कर जाधव यांनी नितेश राणे यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी केली आहे.
“खडसे कुटुंबाकडून माझ्या जीवाला धोका”; चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप
“या सभागृहाची प्रथा, परंपरा आणि प्रतिष्ठा राखण्यासाठीचा विषय तिसऱ्यांदा चर्चेला आला आहे. या सभागृहामध्ये तीन दिवसांपूर्वी मी काही अंगविक्षेप केल्यानंतर विरोधापक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि सभागृहाने मला माफी मागायला सांगा, निलंबित करायला सांगितले. त्यानंतर मी माफी देखील मागितली. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासंदर्भात विधीमंडळाच्या पायऱ्यावर बसून विरोधांनी आवाज काढले. आमदार सुनील प्रभू यांनी तो विषय मांडल्यानंतर विरोधीपक्ष नेत्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे सल्ला दिला. असे वर्तन करू अस त्यांच्या पक्षातील नेते देखील म्हणाले होते तरीही नितेश राणे हे जुमानत नाहीत. बाहेर जाऊन माध्यमांसमोर बोलतच होते,” असे भास्कर जाधव यांनी म्हटले होते.
Read also:
- “सरकार हरवलं आहे”चा सदरा परिधान करत मंगेश चव्हाणांची आघाडी सरकारवर टीका
- दिवंगत सुमंत रुईकर यांच्या कुटुंबीयांची संपूर्ण जबाबदारी ठाणे जिल्हा शिवसेना घेणार – एकनाथ शिंदे
- राष्ट्रवादीचे पार्थ पवार लोकसभा निवडणूक आता शिरुरमधून लढणार? अजित पवारांची २०२४ साठी मोठी रणनिती
- शिवसेनेचे नेते, माजी मंत्री तानाजी सावंत भाजपच्या वाटेवर? पंढरपुरात केलेल्या वक्तव्यामुळे खळबळ
- त्यांच्या अर्थसंकल्प मांडण्याच्या पद्धतीवरून त्यांची अक्कल कळते; राणेंची पवारांवर घणाघाती टीका