सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निमित्ताने राजकारण चांगलेच पेटलेले दिसत आहे. सिंधुदुर्गात भारतीय जनता पक्ष म्हणजे नारायण राणे गट विरुद्ध सर्व पक्षीय अशी लढत होणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात महाविकास आघाडीने मोट बांधलेली दिसत आहे.
बैलगाडा शर्यतीला परवानगी: भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून महेश लांडगेंचे तोंडभरून कौतूक
काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंधुदुर्गचा दौरा केला. यामध्ये अजित पवारांनी नारायण राणेंवर सडकून टीका केली होती. अजित पवारांनी आपल्या शैलीत भाषण करत असताना म्हटलं होतं की सिंधुदुर्गच्या जिल्हा बँकेच्या प्रतिनिधींना, मतदारांना मला सांगायचं आहे की बाबांनो फार विचार करून मतदान करा. संस्था उभ्या करायला डोकं लागतं, अक्कल लागते. मात्र, संस्था अडचणीत आणायला डोकं, अक्कल लागत नाही. सर्वांनी निर्धाराने मतदान करा.
मोठी बातमी..! अनिल परबांना सीबीआयचं समन्स?, परब म्हणतात…
त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या राजकीय गुंडगिरीला भीक न घालता मतदारांनी चांगल्या उमेदवारांना निवडणूक द्यावे. कोणत्याही प्रकारे गाफील न राहता या सर्व गोष्टी करा असा सल्ला देखील पवारांनी मतदारांना दिला होता. त्यानंतर लगेचच नारायण राणेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना उत्तर दिले आहे. मी अजित पवारांना १०० कोटी रुपये सिंधुदुर्गच्या विकासासाठी द्या असं म्हटलो होतो. त्यांनी ते दिले नाही. लघपाटबंधाऱ्याचं टेंडर काढलं नाही, १३ कोटी यायला पाहिजे होते, तिथे साडेसहा कोटी रुपये आले. त्यातील एकही पैसा खर्च नाही. वर्ष संपायला ३ महिने आहेत तरी १ रुपयाही खर्च नाही.
एकनाथ खडसे यांचे मानसिक संतुलन बिघडले; शिवसेना आमदाराचा हल्लाबोल
असा गलथान कारभार यांचा आहे. रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे हे दुसऱ्यांना मोठे अकलेचे धडे शिवकवायला जातात आणि अर्थसंकल्प कशा पद्धतीने मांडला जातोय यावरून आमच्या सर्व विचारवंतांची अक्कल कळते,” असा टोला नारायण राणे यांनी अजित पवार यांना लगावला.
Read also:
- पहिल्या बैलगाडा शर्यतसाठी राष्ट्रवादी आणि शिवसेनामध्ये चढाओढ
- “एसटी कर्मचाऱ्यांशी आमचं वैर नाही मात्र लोकांची अडवणूक नको”
- “१५ ते १८ वयोगटातील मुलांना लस देण्यात येणार”, पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
- फडणवीस म्हणतात,”विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबात राज्यपाल निर्णय घेतील”
- ४0 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांवर मोदींचा प्रभाव, जीन्स घालणाऱ्या मुलींवर नाही, दिग्विजय सिंह यांचं अजब विधान