पुणे : महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून बळीराजाचा असलेला लढा अखेर यशस्वी झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना सशर्त मंजुरी दिली आहे. या शर्यतीच्या सुनावणीदरम्यान पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तथा भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी दिल्लीत तळ ठोकला होता. या पाठपुरठ्याबाबतीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आमदार लांडगे यांचे तोंडभरून कौतूक केले.
ओबीसी समाजाची 17 डिसेंबरला चक्काजाम आंदोलनाची हाक
सर्वोच्च न्यायालयात बैलगाडा शर्यत बंदीबाबत आज (दि. १५ ) सुनावणीस सुरुवात झाली. न्यायमूर्ती खानविलकर यांच्यासमोर ही सुनावणी झाली. महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ सीनियर कौन्सिल ॲड. मुकुल रोहतगी यांनी जोरदार युक्तिवाद केला. शर्यत बंदीला समर्थन करणाऱ्या पक्षाकडून ॲड. अंतुरकर यांनी युक्तिवाद केला.
मनसेला मोठे खिंडार, रुपाली पाटील यांचा राजीनामा; मनगटावर ‘घड्याळ’ बांधणार
चंद्रकांत पाटील म्हणाले की, आमदार महेश लांडगे यांनी बैलगाडा शर्यतीसाठी वारंवार पाठपुरवठा केला. विशेषत: गेली अनेक दिवस सुनावणी दरम्यान लांडगे यांनी दिल्लीत तळ ठोकून बसले. त्याचबरोबर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यासह अनेक नेत्यांनी आंदोलने केले. त्यांच्या आंदोलनाला खऱ्या अर्थाने आज यश मिळाले. त्याबद्दल त्यांच मनापासून कौतूक करतो, असे पाटील म्हणाले.
तुम्ही कायम माझ्या हृदयात रहाल; रुपाली पाटील यांचं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भावनिक पत्र
शासनाने दि. १५ जुलै २०११ च्या परीपत्रकानुसार बैलाचे वर्गीकरण जंगली प्राण्यांमध्ये केले आहे. त्यामुळे राज्यातील बैलगाडी शर्यत पूर्ण बंद झाले होते. दरम्यान, महाराष्ट्र शासनाने एप्रिल २०१७ मध्ये बैलगाडा शर्यती सशर्त सुरू करण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने कायदा केलेला आहे. परंतु, या कायद्यास काही शर्यत विरोधकांनी न्यायालयात आव्हान दिले. मुंबई हायकोर्टाने बैलगाडी शर्यतीवर बंदी घातल्यानंतर याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. त्यांनी महाराष्ट्रातील जनतेच्या भावना समजून घेतल्या, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
Read Also :
- बैलगाडा शर्यत लढा : विजय महाराष्ट्रातील बळीराजाचा… आपल्या सर्जा-राजाचा…!
- रामदास कदम यांना मोठा धक्का; कदम समर्थकांना शिवसेनेने पदावरून हटवलं
- ठरलं! रुपाली पाटील हातावर घड्याळ बांधणार, अजितदादांच्या उपस्थितीत मुंबईत होणार पक्षप्रवेश
- चंद्रकांत पाटलांच्या वैधानिक अभ्यासाबद्दल न बोललेलंच बरं – भास्कर जाधव
- बैलगाडा शर्यतीचा लढा: सुप्रिम कोर्टाच्या सुनावणीत उद्या अंतिम निर्णय, आमदार महेश लांडगे यांची माहिती