मुंबई – विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. अध्यक्षांची निवडणूक राज्याच्या हिवाळी अधिवेशनात होणार आहे. २७ आणि २८ डिसेंबरला ही निवडणूक होणार आहे. अध्यक्षांच्या निवडीबाबत राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी निर्णय घेतील असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ते १८ वर्षांमधील मुलांच्या लसीकरणाला परवानगी दिली आहे. या पंतप्रधानांच्या या निर्णयाचे फडणवीसांनी स्वागत केलं आहे.
मला मनःस्ताप होतोय, आत्महत्या करावीशी वाटतेय; तुकाराम सुपेचा इशारा!
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना माध्यमांशी संवाद साधताना विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावर फडणवीस म्हणाले की, राज्यपालांचे अधिकार किंवा विधानसभा अध्यक्षांची निवडणूक या संदर्भात जो काही निर्णय आहे तो निश्चितपणे राज्यपाल घेतील. पण या संदर्भात आम्ही जे काही बदल केले आहेत ते बदल भारतीय संविधानाच्या आर्टीकलशी सुसंगत वाटत नाहीत. अशा प्रकारे सर्व अधिकार काढून घ्यायचे आणि विधिमंडळाच्या कामकाजामध्ये अधिक महत्त्व द्यायचे हे काही योग्य नाही म्हणून आम्ही याचा विरोध केला आहे
शिवेंद्रराजे भोसलेंनी घेतली मनसे आमदार राजू पाटील यांची भेट..!
आमदारांना कोरोनाची लागण झाल्यामुळे राज्य सरकार अधिवेशन गुंडाळणार का? असा प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला. यावर फडणवीस म्हणाले, राज्याचे हिवाळी अधिवेशन दोन दिवसांचे राहिले आहे. अधिवेशन गुंडाळून गुंडाळून काय गुंडाळणार.. पहिल्या दिवशीच अधिवेशन गुंडाळले आहे. पाच दिवसांचे अधिवेशन ठेवणं म्हणजे गुंडाळल्यासारखेच असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
Read also:
- ४0 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांवर मोदींचा प्रभाव, जीन्स घालणाऱ्या मुलींवर नाही, दिग्विजय सिंह यांचं अजब विधान
- एकनाथ खडसे यांचे मानसिक संतुलन बिघडले; शिवसेना आमदाराचा हल्लाबोल
- नितीन राऊतांना मोठा धक्का; काँग्रेसनं ‘ते’ पद घेतलं काढून…
- “खडसे कुटुंबाकडून माझ्या जीवाला धोका”; चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप
- “आगामी पुणे महापालिका निवडणुकीत भाजपा किमान १२० जागी विजयी होणार!”