जळगाव – राज्यात एकीकडे महाविकास आघाडी तर जळगाव जिल्ह्यात मुक्ताईनगर येथे आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मुक्ताईनगर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांची चांगलीच शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. याची सुरुवात बोदवड नगरपंचायतीच्या प्रचारादरम्यान झालीय. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्याशी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाब्दिक चकमक केल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.
“महाविकास आघाडी सरकार गेंड्याच्या कातडीपेक्षाही भयानक”; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांवर निशाणा
मुक्ताईनगर मतदारसंघात अवैध धंदे हे शिवसेनावाल्यांचे आहेत, असा आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना निवेदन देऊन केला होता. त्यानंतर शिवसेनेने देखील अशाच सर्वच्या सर्व अवैध धंदे राष्ट्रवादी वाल्यांचे असल्याचा आरोप केला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष यांचा आम्ही आदर करतो आम्ही कुठल्या प्रकारे यांच्याशी शाब्दिक चकमक न केल्याचा खुलासा शिवसेनेने केला होता. जिल्हा पोलिस अधीक्षकांना शिवसेनेनं देखील निवेदन दिले होते.
बोदवड येथील प्रचारादरम्यानचा वाद शांत होत नाही तोवर मुक्ताईनगरात पुन्हा शुक्रवारच्या मध्यरात्री एकनाथ खडसे यांचे कट्टर समर्थक व मुक्ताईनगर चे शिवसेनेचे आमदार यांचे कट्टर समर्थक यांच्यात हमरीतुमरी झाली. हा वाद पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचला. यानंतर दोन्ही प्रतिस्पर्धी शिवसेना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
…त्या शब्दांना दूर ठेवूनही हिंदुत्वाचं राजकारण करता येतं हे त्यांनी दाखवून दिलं – संजय राऊत
या प्रकरणात एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिनी खडसे यांनी उडी घेतली. महिलांवरील होत असलेल्या अत्याचाराबाबत आमदारांना चोप देण्याची भाषा वापरली. आमदार चंद्रकांत पाटील यांनी चक्क जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनाच याबाबत खडसे परिवाराकडून मला जीवास धोका असल्याची तक्रार दिली आहे. एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तर, मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनीदेखील एकनाथ खडसे व रोहिणी खडसे यांना प्रत्युत्तर दिल्यानं चांगलीच खडाजंगी निर्माण झाली आहे
Read also:
- “आगामी पुणे महापालिका निवडणुकीत भाजपा किमान १२० जागी विजयी होणार!”
- ओमिक्रोनच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात नवी नियमावली लागू, असे असतील नवे निर्बंध..!
- “पेपरफुटीत कोणताही मंत्री अडकणार नाही, आमची यंत्रणा सक्षम, दुसऱ्याला निमंत्रण कशाला?”
- मोठी बातमी..! अनिल परबांना सीबीआयचं समन्स?, परब म्हणतात…
- “भारतीय जनता पक्षाचं “संबंधित पात्र” पुन्हा बरळलं”; रुपाली ठोंबरेंचा संबित पात्रांवर हल्लाबोल