पुणे – पुणे जिल्ह्यात नवी नियमावली लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुखांनी लेखी आदेश काढले आहेत. लग्न समारंभाला बंद जागेत 100 लोकांच्या उपस्थितीला परवानगी असणार आहे तर मोकळ्या जागेत 250 जणांना परवानगी असणार आहे. जिम, रेस्टॉरंट, स्पा, हॉटेलमध्ये 50 टक्के उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. राजकीय, धार्मिक ,कार्यक्रमात 100 लोकांनाच परवानगी असणार आहे. रात्री 9 ते सकाळी 6 यावेळेत पाचपेक्षा अधिक लोक एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. नियमांच उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.
राणेंच्या म्याव म्यावचे विधानसभेत पडसाद; फडणवीस, पवार, मुनगंटीवारांनी टोचले राणेंचे कान
राज्यात ओमिक्रॉनचा प्रसार हा वेगाने वाढत चालला आहे, त्यामुळे राज्य सरकार पुन्हा काही जिल्ह्यात निर्बंध लागू करत आहे. ऑमिक्रॉनचा पहिला रुग्ण कल्याण-डोंबिवलीत आढळून आल्यानंतर ओमिक्रॉनने पुण्यतही शिरकाव केला. त्यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागात ओमिक्रॉनचे रुग्ण जलदगतीने वाढताना दिसून आले, त्यामुळेच राज्य सरकारने आता नाताळाच्या सणाला होणारी गर्दी टाळण्यासाठी आणि ओमिक्रॉनचा फैलाव रोखण्यासाठी पुन्हा निर्बंध कडक केले आहेत.
पुण्यातली नाईट लाईफ नेहमीच चर्चेत असते, अनेक हॉटेल, पब, बारमध्ये अनेक कार्यक्रमात लोकांची गर्दी होते, हीच गर्दी टाळण्यासाठी पुण्यात रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही, लोक नियम मोडताना दिसून आले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
२१६ जिवंत व्यक्तींचा मृतांमध्ये समावेश; शासनाचा गलथान कारभार की ५० हजारांची लालसा?
तसेच लग्न समारंभालाही काही लोकांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. तसेच जिम, रेस्टॉरंट, स्पा, हॉटेलमध्ये 50 टक्के उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. ओमिक्रॉनमुळे जगावर तिसऱ्या लाटेची टांगती तलवार आहे, भारतालाही तिसऱ्या लाटेचा धोका आहे, त्यामुळे सर्वच राज्यात लसीकरणावर भर दिला जात आहे. त्यासाठी सरकार कठोर पावलं उचलत आहे. सरकारकडून वारंवार नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन होऊ द्यायचं नसेल तर नियमांचे काटेकोर पालन करा
Read also:
- “पेपरफुटीत कोणताही मंत्री अडकणार नाही, आमची यंत्रणा सक्षम, दुसऱ्याला निमंत्रण कशाला?”
- मोठी बातमी..! अनिल परबांना सीबीआयचं समन्स?, परब म्हणतात…
- “भारतीय जनता पक्षाचं “संबंधित पात्र” पुन्हा बरळलं”; रुपाली ठोंबरेंचा संबित पात्रांवर हल्लाबोल
- “त्या पेनड्राईव्हचा सोर्स काय? देवेंद्र फडणवीसांनी हे सांगणं बंधनकारक”
- “गळ्यात पडायचं, पप्प्या घ्यायचं…”; शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंवर पलटवार