मुंबई – राज्याचे अल्पसंख्याकमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. पत्रकारपरिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी जो पेनड्राईव्ह दाखला त्या पेनड्राईव्हाचा सोर्स काय आहे? हे त्यांनी सांगणं बंधनकारक असल्याचंही मलिक म्हणाले आहेत.
“वळसे पाटील, अहो तुमच्यापेक्षा पेंग्विनना पगार जास्त”; विधानसभेत मुनगंटीवारांची शाब्दिक फटकेबाजी!
नवाब मलिक म्हणाले, “ त्यांनी पत्रकारपरिषद घेऊन भरती, बदल्या यामध्ये भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. त्यांनी स्वत: सांगितलं होतं की माझ्याकडे पेनड्राईव्ह आहे आणि ते मी केंद्रीय यंत्रणांना देणार आहे. आता पेनड्राईव्ह कुणी दिला याची माहिती देणं हे बंधनकारक आहे. आता काही लोकांच्या बाबत मी बोललो, त्याची चौकशी केंद्र सरकारच्या काही मागास आयोगाच्या आदेशानंतर त्याची चौकशी सुरू होईल. मी जी कागदपत्रे, व्हिडिओ सादर केले पोलिसांनी तपासासाठी माझा जबाब घेतला आणि त्याचे सोर्स काय आहे, हे मी त्यांनी सांगितलं आहे. देवेंद्र फडणवीसांकडे जर तो पेनड्राईव्ह होता, त्याचा सोर्स काय आहे हे त्यांनी सांगणं बंधनकाकर आहे. त्यांनी ते सांगितलं पाहिजे. माझे सोर्स मी सांगू शकत नाही, असं होऊ शकत नाही.”
तसेच, “शासकीय कार्यालयातून छुप्या पद्धतीने जर कोणी काही माहिती पेनड्राईव्हमध्ये घेतली असेल आणि ती माहिती त्यांच्याकडे आली असेल तर ती कोणी दिली याची माहिती देणं हे बंधनकारक आहे. डेटा लिकचा धंदा बऱ्याचसा धंदा या राज्यात झालेलाच आहे. काही ओएसडी लोकांनी डेटा चोरलेला देखील आहे याची देखील आज ना उद्या चौकशी सुरू होईलच.” असंही मलिक यांनी बोलून दाखवलं.
धक्कादायक..! अधिवेशन सुरु असताना विधानभवनाबाहेर महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न
दरम्यान, २३ मार्च २०२१ रोजी एका पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी महाराष्ट्रातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्तींमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्यांनी काही कागदपत्रे आणि तत्कालीन एसआयडी आयुक्त रश्मी शुक्ला यांनी त्यांच्या आरोपांच्या समर्थनार्थ तयार केलेल्या अहवालांकडे लक्ष वेधलं होतं. त्यांनी असा दावा केला होती की, राज्याने अहवालावर कारवाई केली नाही आणि म्हणून ते पेन ड्राईव्हसह संपूर्ण साहित्य गृहमंत्रालयाकडे सोपवणार आहेत.
Read also:
- “गळ्यात पडायचं, पप्प्या घ्यायचं…”; शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंवर पलटवार
- शिवेंद्रराजे भोसलेंनी घेतली मनसे आमदार राजू पाटील यांची भेट..!
- फडणवीसांना समन्स बजावल्यानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले…
- वाघाला पाहून नितेश राणेंच्या तोंडातून म्याव- म्याव आलं असेल; किशोरी पेडणेकरांची खोचक टीका
- “मला बदनाम करण्याचा प्रयत्न”; रामदास कदमांच्या आरोपावर वैभव खेडेकरांची प्रतिक्रीया