मुंबई – मुंबईच्या राणीबागेतले पेंग्विन हा पर्यटकांसाठी आणि सामान्य मुंबईकरांसाठी चर्चेचा विषय ठरला होता, तसाच तो राजकीय नेतेमंडळींमध्ये देखील चर्चेचा विषय झाला होता. हे पेंग्विन आणि त्यांच्यावर होणारा खर्च, त्यांची आवश्यकता, त्यांच्यासाठीचा हट्ट अशा बऱ्याच मुद्द्यांवरून राजकीय टोलेबाजी, आरोप-प्रत्यारोप झालेले पाहायला मिळाले आहेत. भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पेंग्विनच्या मुद्द्यांवरून सरकारवर टीका करताना थेट राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावरच खोचक शब्दांत निशाणा साधला आहे
ओबीसी आरक्षणासाठी फडणवीस दिल्लीला जाणार असतील तर तिकीट काढून देतो – छगन भुजबळ
यावेळी बोलताना मुनगंटीवार यांनी पेंग्विनवरील खर्चाची तुलना थेट राज्यातील मंत्र्यांच्या पगाराशी केली! “वळसे पाटील साहेब, एवढा पगार तर मंत्री म्हणून तुम्हाला नाही हो. तुमच्यापेक्षा पेंग्विन वरच्या श्रेणीत येतो. कारण मंत्र्याचा पगार २ लाख ५२ हजार किंवा ५३ हजार आहे. पण त्याचा (पेंग्विन) ६ लाख आहे हो. म्हणजे मंत्र्यापेक्षा पेंग्विन पॉवरफुल! १५ कोटी रुपये पेंग्विनवर खर्च होतो. आमची मानसिकता किती भिकारी असावी”, असं मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
शक्ती कायद्याला विधानसभेत एकमताने मंजुरी; विरोधकांनीही दिला पाठींबा
यावेळी सरकार परीक्षांमध्ये गरीब विद्यार्थ्यांकडून शुल्कापोटी पैसे घेत असून राणीबागेतल्या पेंग्विनवर मात्र कोट्यवधींचा खर्च होत असल्याचा मुद्दा सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. या मुद्द्यावरून टीका करताना मुनगंटीवार यांनी एक किस्सा सांगितला. यामध्ये त्यांना भेटलेल्या एका गरीब विद्यार्थ्याने दिलेल्या उत्तरावरून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. यासंदर्भातला व्हिडीओ मुनगंटीवार यांनी आपल्या ट्विटर हँडलवर देखील शेअर केला आहे.
मरावे आणि पेंग्विन व्हावे..! pic.twitter.com/4IKZ8Ew2ZH
— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) December 24, 2021
Read also:
- “अजितदादा, तुम्ही शेजाऱ्यांचे अनुकरण करा!”; सुधीर मुनगंटीवार यांनी साधला निशाणा
- महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजनेपासून सरकार पळ काढणार नाही – अजित पवार
- कामगार न्यायालयाचा संपकऱ्यांना दणका; ‘त्या’ कर्मचाऱ्यांची सेवेतून केली तात्काळ हकालपट्टी
- “…नाही तर कोर्टात जाईल”; रामदास कदम यांचा आघाडी सरकारला घरचा आहेर
- काँग्रेस, राष्ट्रवादीने आम्हाला मुर्ख समजून नये; खासदार इम्तियाज जलील संतापले