मुंबई : एसटीच्या संपात सहभागी झालेल्या कामगारांना एसटी महामंडळाने बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावली होती. या बडतर्फीच्या कारवाई विरोधात काही कर्मचाऱ्यांनी स्थानिक कामगार न्यायालयात तक्रार दाखल केली होती. याबाबत निकाल देताना लातूर व यवतमाळ येथील कामगारांना न्यायालयाने एसटी महामंडळाच्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर महामंडळाकडून संबंधित ९ कामगारांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
आणखी एक बळी: निलंबित केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
लातूर व यवतमाळ विभागात बेकायदेशीर संपामध्ये सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांविरोधात नियोजीत कामावर गैरहजर, एसटीच्या वाहतूकीस अडथळा निर्माण करणे, इतर कर्मचाऱ्यांना संपासाठी प्रवृत्त करणे, एसटीची वाहतूक बंद करणे, आर्थिक नुकसान करणे, या कारणांसाठी दोषारोप पत्र दाखल करून, समक्ष सुनावणी घेऊन राज्य परिवहन सेवेतून बडतर्फ का करण्यात येऊ नये, अशी कारणमिमांसा नोटीस बजावली होती.
भाजपाच्या प्रियांका बारसे ‘भरभरुन हसल्या’ अन् राष्ट्रवादीच्या अजित गव्हाणेंच्या ‘अडचणी वाढल्या’!
या नोटीसीच्या विरोधात संबंधित कर्मचारी यांनी मा. कामगार न्यायालय, लातूर व यवतमाळ यांच्याकडे तक्रार (युएलपी) दाखल केली होती. या तक्रारीवर निकाल देताना मा. कामगार न्यायालयाने संबंधित अर्जदाराची तक्रार अवैध ठरवून एसटीने केलेल्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.
Read also:
- “…नाही तर कोर्टात जाईल”; रामदास कदम यांचा आघाडी सरकारला घरचा आहेर
- काँग्रेस, राष्ट्रवादीने आम्हाला मुर्ख समजून नये; खासदार इम्तियाज जलील संतापले
- रामदास कदम यांना विधानभवनात जाण्यापासून अडवलं; पोलिसांनी गेटवरचं रोखलं
- अजित पवारांनी काल विधानसभेत चपराक लगावून सुद्धा एकनाथ शिंदेनी केली गडबड..
- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना क्लीन चीट द्यायचे, ते स्वत:ला न्यायाधीश समजायचे – नाना पटोले