मुंबई : आताच्या घडीला राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू असून, अनेकविध मुद्द्यांवरून सत्ताधारी महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि प्रमुख विरोधी पक्ष भाजप यांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, सभागृहात नेत्यांमध्ये खडाजंगी होताना दिसत आहे. यातच काँग्रेसने विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मुद्दा लावून धरला आहे. स्वत:वरील कलंक पुसण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याची टीकाही नाना पटोले यांनी केली आहे.
फडणवीसांनी मागतिलेला ‘१५ लाखांचा’ पुरावा सत्यजित तांबेनी दिला; मोदींचा ‘तो’ व्हिडीओच समोर आणला
भाजपनं त्यांच्या काळात राज्यात अधिवेशन कसं चालवलंय हे जनतेनं पाहिलं आहे. नरेंद्र मोदी संसद कशी चालवतात हे देशानं पाहिलं आहे. विरोधकांनी काल आम्ही किती चांगले आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. सत्ता गेल्यानं आलेला हताशपाणा विरोधकांच्या चेहऱ्यावर दिसत होता. नोकरभरती घोटाळ्यामध्ये पटवारी, कृषी सहाय्यक भरती घोटाळा सुरु झाला होता. सुखदेव डेरेला क्लिन चिट देण्यात आली होती. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस क्लीन चीट द्यायचे, ते न्यायधीश असल्यासारखं वागायचे, असं नाना पटोले म्हणाले आहेत. विरोधकांचा फुसका बार निघाला आहे, असंही पटोले म्हणाले.
गेल्या ९ महिन्यांपासून विधानसभा अध्यक्षपदाची जागा रिकामी आहे. राज्यपालांकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. तो मंजूर झाला की, लगेचच प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी माहिती देत जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाही, तोपर्यंत नाव कळणार नाही, असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले. त्यानंतर उमेदवारांची नावे कळतील, असेही ते म्हणाले. तर, २८ डिसेंबर रोजी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याचे सांगितले जात आहे.
राज्यात पुन्हा एकदा लागणार ‘निर्बंध’; रात्रीची जमावबंदी, नवीन नियमावली होणार आज जाहीर
विधिमंडळाच्या कामकाजाचा कालावधी वाढवून देण्याची मागणी भाजप करत आहे. मात्र, स्वतःवरील कलंक पुसण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. विधानसभा आपला राग काढण्यासाठी नाही. सत्ता गेल्याचा हताशपणा भाजपमध्ये दिसला. याशिवाय महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला अडचणीत आणू, हा भाजपचा फुसका बार निघाला. भाजप स्वतः घोटाळेबाज आहे. त्यामुळेच त्यांना सगळीकडे घोटाळे दिसत आहे, अशी घणाघाती टीकाही नाना पटोले यांनी यावेळी बोलताना केली.
Read also:
- भाजपाच्या प्रियांका बारसे ‘भरभरुन हसल्या’ अन् राष्ट्रवादीच्या अजित गव्हाणेंच्या ‘अडचणी वाढल्या’!
- विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून संग्राम थोपटे निश्चित?
- विदर्भ-मराठवाडा महाराष्ट्रात येतो का, तुम्ही आपलं मानता का? फडणवीसांचा रोखठोक सवाल
- नवा अध्यक्ष कोण? विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक 28 डिसेंबरला होणार
- ५ राज्यांमध्ये निवडणूका पुढे ढकलण्यामागे भाजपचा मोठा डाव; नवाब मालिकांचा खळबळजनक आरोप