मुंबई : हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही पहिल्या दिवसाप्रमाणेच वादळी ठरला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सुरुवातीलाही विरोधकांकडून पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती.
…तर मी विधानभवनाच्या पायऱ्यांवर नाक घासून माफी मागेन – जितेंद्र आव्हाड
मराठा, धनगर, ओबीसी आरक्षांनंतर आता मुस्लिम समाजानेही आरक्षण मिळावे म्हणून मागणी केली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुस्लिम आरक्षणावरून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. महाविकास आघाडीकडून मुस्लिम समाजाची आरक्षणाच्या बाबतीत सरळ सरळ फसवणूक केली आहे. इम्तियाझ जलील यांनी केलेल्या आरोपांवर आता राष्टवादी काँग्रेस पक्षाचे नेते, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आता जलील यांनी केलेल्या आरोपांवर उत्तर दिले आहे.
आणखी एक बळी: निलंबित केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
आम्ही आता मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीत अभ्यास करत आहोत. इम्तियाझ जलील हे पत्रकार आहेत, त्यांना माझ्या पेक्षा जास्त माहिती आहे. जलील यांनी लंडनमधून शिक्षण पूर्ण केलेले आहे. आम्ही स्पष्ट सांगितले आहे की इंदिरा जयसिंगाच्या केसच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिले आहेत त्यानुसार ५० टक्क्यांच्या वर आरक्षण देण्यात येत नाही.
करुणा मुंडेंची नव्या राजकीय पक्षाची घोषणा; नावही जाहीर, पण पक्षप्रवेशाच्या ऑफर नाकारल्या
या केसच्या आधी बाकी ठिकाणी काही राज्यांमध्ये आरक्षण लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे आम्ही उल्लू बनवत आहोत असा आरोप करण चुकीचं आहे. तुम्ही सांगा की कोणत्या प्रकारे आम्हाला लढा देता येईल, त्यानुसार आम्ही नक्कीच आरक्षणासाठी प्रयत्न करू. त्यातच आता ओमायक्रोनच्या संकटामुळे निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्याची तयारी सुरु आहे. निवडणूका पुढे ढकलून ५ राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करून त्याठिकणी भाजपची सत्ता येण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु आहेत. यात भाजपचा मोठा डाव आहे असा आरोपही मालिकांनी भाजपवर केला आहे.
Read also:
- आमच्या जीवावर काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांची चैन सुरु; कोल्हापुरात शिवसेनेची विरोधकांवर जहरी टीका
- राज्यात पुन्हा एकदा लागणार ‘निर्बंध’; रात्रीची जमावबंदी, नवीन नियमावली होणार आज जाहीर
- शिवसेनेची अवस्था ‘म्याव म्याव’ सारखी झाली आहे; आमदार नितेश राणेंचा घणाघात
- शक्ती कायद्याला विधानसभेत एकमताने मंजुरी; विरोधकांनीही दिला पाठींबा
- ओबीसी आरक्षणासाठी फडणवीस दिल्लीला जाणार असतील तर तिकीट काढून देतो – छगन भुजबळ