मुंबई : हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवसही पहिल्या दिवसाप्रमाणेच वादळी ठरला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सुरुवातीलाही विरोधकांकडून पायऱ्यांवर आंदोलन करत सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे हे देखील सहभागी झाले होते.
ओबीसींच्या जनगणनेसाठी वंचित बहुजन आघाडीचा विधानभवनावर मोर्चा; पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे यावेळी विधिमंडळात प्रवेश करत होते. आदित्य ठाकरेंना पाहून लगेचच नितेश राणे यांनी त्यांच्या विरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली. नितेश राणे यांनी ‘म्याव म्याव म्याव म्याव’ अशा घोषणा दिल्या होत्या. आमदार सुनील प्रभू यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले होते कि वाघाला पाहून मांजर म्यावम्यावचं करत असते. त्यांनी कोंबड्यासारखे कॉक कॉक जरी केले असते तरी देखील आम्हाला काही वाटले नसते असं देखील प्रभू यांनी म्हटलं होत.
…तर मलाही सभागृहाच्या बाहेर काढा; विधानभवनात अजित पवारांचा संताप
यावर आता नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नितेश राणे यांना पत्रकारांशी बोलताना यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, मी म्याव म्याव केलं कारण शिवसेनेची अवस्थाच म्याव म्यावसारखी झाली आहे. ही अवस्था कशामुळे झाली हे त्यांनी शोधलं पाहिजे. आधी वाघाची डरकाळी देणारी शिवसेना आणि आता म्याव म्याव करणारी शिवसेना आहे .यावर आक्षेप घेतला जाऊ शकतो असं सांगण्यात आलं असता ते म्हणाले की, आम्हाला आता शिवसेनेच्या आक्षेपाची सवय झाली आहे. त्यामुळे आम्ही आता त्यांच्याकडे लक्ष देणार नाही आणि त्यांना अजिबातच घाबरणार नाही असं देखील राणेंनी म्हटलं आहे.
Read also:
- शक्ती कायद्याला विधानसभेत एकमताने मंजुरी; विरोधकांनीही दिला पाठींबा
- ओबीसी आरक्षणासाठी फडणवीस दिल्लीला जाणार असतील तर तिकीट काढून देतो – छगन भुजबळ
- करुणा मुंडेंची नव्या राजकीय पक्षाची घोषणा; नावही जाहीर, पण पक्षप्रवेशाच्या ऑफर नाकारल्या
- आणखी एक बळी: निलंबित केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
- …तर मी विधानभवनाच्या पायऱ्यांवर नाक घासून माफी मागेन – जितेंद्र आव्हाड