मुंबई : राजकारण बाजूला ठेवा, आपण धरणे धरा, पण गुरुकिल्ली दिल्लीत फिरवायची असेल तर चंद्रकांत पाटील, फडणवीस तुमची गरज आहे, अशी साद छगन भुजबळ यांनी घातली आहे. ओबीसी आरक्षणासाठी तुम्ही दिल्लीत जा, जात असाल तर तिकीट काढून देतो, पण तुमचं त्यांनी ऐकलं पाहिजे, असेही भुजबळ म्हणाले आहेत. ओबीसी आरक्षणाच्या इंपेरिकल डेटावरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये सध्या जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.
अनिल परब आणि नितेश राणेंमध्ये सभागृहात हमरीतुमरी; फडणवीसांच्या मध्यस्तीनंतर वाद मिटला
यावेळी भुजबळ म्हणाले, संपूर्ण देशातील ओबीसी आरक्षण धोक्यात आले आहे. केंद्र सरकारने जर इम्पेरिकल डाटा सर्व राज्यांना दिला असता तर ही वेळ आली नसती, त्यातील चुका दुरुस्त करायला हव्या होत्या असेही भुजबळ म्हणाले आहेत. महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेशचे ओबीसी आरक्षण कोर्टाने रद्द केलं, त्यानंतर मध्य प्रदेशचे नेते केंद्राकडे गेले असतील आणि त्यांनी मागणी केली असेल केंद्राने याचिका दाखल करावी, त्यामुळेच केंद्राकडून हलचाली सुरू आहेत. तुम्हीही केंद्राकडे जायला हवं, असा सल्ला भुजबळांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना दिला आहे. ओबीसी आरक्षण पुन्हा कसे मिळेल? यावर उपाय शोधला पाहिजे, आम्ही प्रयत्न करतो आहे, मात्र भाजपच्या नेत्यांनी केंद्रात प्रयत्न करायला हवे.
मुंबईत नितेश राणेंच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक; ‘त्या’ ट्वीट विरोधात काळाचौकी पोलिसांत तक्रार
भुजबळ म्हणाले, राज्यात सध्या सुरू असलेल्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाविनाच पार पडत आहेत. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याची मागणीही करण्यात आली होती, मात्र निवडणूक आयोगाने ठरलेल्या वेळेतच निवडणुका घेतल्या आहेत. केंद्र सरकारला ओबीसी राजकीय आरक्षणावर कायमस्वरुपी मार्ग काढायचा असल्यासं त्यांना घटनात्मक दुरुस्ती करणं गरजेचं आहे. त्यानंतर कृष्णमूर्ती जजमेंट मुळं निर्माण झालेल्या परिस्थितीवर मार्ग निघू शकतो. घटनादुरुस्ती नंतर सरकारला कलम 243 ड आणि 243 टी मधील ओबीसी सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणासाठी वापरली जाणारी यादी ओबीसी राजकीय आरक्षणासाठी वापरता येऊ शकते.
Read also:
- करुणा मुंडेंची नव्या राजकीय पक्षाची घोषणा; नावही जाहीर, पण पक्षप्रवेशाच्या ऑफर नाकारल्या
- आणखी एक बळी: निलंबित केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
- …तर मी विधानभवनाच्या पायऱ्यांवर नाक घासून माफी मागेन – जितेंद्र आव्हाड
- …तर मलाही सभागृहाच्या बाहेर काढा; विधानभवनात अजित पवारांचा संताप
- ओबीसींच्या जनगणनेसाठी वंचित बहुजन आघाडीचा विधानभवनावर मोर्चा; पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड