मुंबई : विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच परिवहन मंत्री अनिल परब आणि भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्यामध्ये आसनव्यवस्थेच्या मुद्द्यावरुन वाद झाला. या वादामध्ये अखेर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करुन वाद मिटवावा लागला.
…तर महाराष्ट्रातील शाळा पुन्हा बंद होणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच मोठं वक्तव्य
झालं असं की, अनिल परब यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत असतानाच नितेश राणे यांनी जागेवरुन उठून त्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यावर परब यांनी तुमची प्रश्न विचारण्याची वेळ आली की प्रश्न विचारा असं सांगितलं. त्यानंतरही नितेश राणे ओरडून बोलत असल्याने परब यांनी विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांना नितेश राणेंना समज द्यावी अशी मागणी केली. त्यानंतर नितेश राणेंनी पुन्हा मोठ्याने प्रश्न विचारण्यास सुरुवात केल्यानंतर परब यांनी नितेश राणे त्यांच्या जागेवर बसलेलं नसल्याचं म्हटलं. यावरुनच पुढे वाद वाढत गेला.
पुणे जिल्हा बॅंक निवडणुकीमध्ये दत्तात्रय भरणे आणि जगदाळे बिनविरोध..!
नितेश राणेंना जागेवर पाठवण्यात यावं यावर परब आडून राहिले. आसनव्यवस्थेप्रमाणे त्यांना त्यांच्या जागी बसण्यासाठी पाठवावं अशी मागणी परब यांनी झिरवाळ यांच्याकडे केली. त्यानंतर झिरवाळ यांनी नितेश राणेंना आपली आसनव्यवस्था मागच्या बाजूने असल्याचं सांगितलं. “त्यांचा आसनव्यवस्थेचा क्रमांक काय आहे पाहून घ्यावा. तसेच सभापतींनी प्रश्न विचारण्यास परवानगी दिल्यानंतरच स्वत:च्या आसनावरुनच त्यांनी मला प्रश्न विचारावा,” असं परब म्हणाले.
“हे सरकार घाबरलेलं…”; विधानसभा अध्यक्ष निवड प्रक्रियेवरुन फडणवीसांचा घणाघात
झिरवाळ यांनाही राणेंना तुमची आसनव्यवस्था मागील बाजूस असल्याचं सांगितल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील भूमिका मांडली. फडणवीस यांच्या मागच्या आसनावरच नितेश राणे बसले होते. तुम्ही आम्हाला आसन क्रमांक देता. कोण कुठे बसणार हे आम्ही ठरवतो, असं पक्षाची भूमिका स्पष्ट करताना फडणवीस म्हणाले. बराच वेळ हा गोंधळ सुरु राहिला. त्यानंतर फडणवीसांच्या मध्यस्थीने हा वाद थांबला. नितेश राणे यांनीही परब यांच्या उत्तरामध्ये पुन्हा प्रश्न उपस्थित केला नाही. परब यांनी नंतर त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं.
Read also:
- मुश्रीफ-घाटगे संघर्षाला समझोत्याने ब्रेक; कार्यकर्ते ‘या’ सेटलमेंटच्या राजकारणातून धडे घेणार का ?
- मनसेला मोठं खिंडार: औरंगाबादेतील तब्बल 53 कार्यकर्त्यांचे एकाच वेळी राजीनामे
- कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी होऊन प्रचाराला सुरुवात; जिल्हा बँकेसाठी दिग्ग्ज नेत्यांचा कस लागणार
- फडणवीसांनी मागतिलेला ‘१५ लाखांचा’ पुरावा सत्यजित तांबेनी दिला; मोदींचा ‘तो’ व्हिडीओच समोर आणला
- माजी मंत्री अनिल राठोडांच्या पुत्रास विधानसभेच्या उमेदवारीवरून जीवे मारण्याची धमकी; अहमदनगर शहरात खळबळ