पुणे – पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसेचे नेते राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे व जिल्हा बॅंकेचे विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे बिनविरोध झाले आहेत. भरणे व जगदाळे यांच्या विरोधातील उमेदवारी अर्ज अंतीम क्षणाला माघारी घेतल्यामुळे यांची संचालकपदी बिनविरोध वर्णी लागली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यासाठी आणखी दोन दिवसांचा अवधी; ७० हजार कर्मचारी अजूनही संपावर ठाम
पुणे जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीला राज्यामध्ये महत्व आहे. २ जानेवारी रोजी जिल्हा बॅंकेची निवडणूक होणार आहे. आज बुधवार (ता.२२) रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतीम तारीख होती. जिल्हातून ‘ब’ वर्गासाठी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे व इंदापूर तालुक्यातून अ वर्गातून संचालक आप्पासाहेब जगदाळे यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले होते. भरणे यांच्या विरोधामध्ये ‘ब’ वर्गातून चार उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यातील तीन अर्ज यापूर्वीच मागे घेण्यात आले होते. जगदाळे व हर्षवर्धन पाटील यांच्या गटाच्या रावसाहेब कोकाटे यांनी ‘ब’ वर्गातून भरणे यांच्या विरोधामध्ये दाखल केलेला उमेदवारी अर्ज माघारी घेतला नव्हता. तसेच जगदाळे यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रसेच पक्षाच्या भाऊसाहेब सपकळ व सणसरच्या अॅड. रणजित निंबाळकर यांना उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
यातील सपकळ यांनी यापूर्वीच निवडणूक अर्ज माघारी घेतला. मात्र, निंबाळकर यांनी अर्ज माघारी घेतला नव्हता. ‘ब’ वर्गामध्ये भरणे व ‘अ’ वर्गात जगदाळे यांचे पारडे जड होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये जगदाळे यांनी भरणे यांची साथ सोडून माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना साथ दिल्यामुळे जिल्हा बॅंकेची निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जगदाळे यांच्या विरोधामध्ये काय भूमिका घेणार याकडे जिल्हाचे लक्ष लागले होते.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन; ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी
तसेच कोकाटे यांच्या अर्जामुळे ‘ब’ गटातील निवडणूक बिनविरोध होणार नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जगदाळे यांच्या विरोधातील निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज व भरणे यांच्या विरोधातील कोकाटे यांचे उमेदवारी अर्ज आज माघारी घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भरणे व जगदाळे यांची संचालक पदी बिनविरोध निवड झाली आहे.
Read also:
- …तर महाराष्ट्रातील शाळा पुन्हा बंद होणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच मोठं वक्तव्य
- फडणवीसांच्या मनात ‘ती’ सल असल्यामुळेच मला माफी मागायला लावली – भास्कर जाधव
- “..अशा धंद्यांमुळे पुढच्या निवडणुकीत हे नक्की पडतील”, नक्कल प्रकरणावरुन मुनगंटीवारांचा सत्ताधाऱ्यांना इशारा
- अजित पवारांना मुख्यमंत्र्यांचा चार्ज दिला, तर 4 दिवसांत राज्य विकतील – गोपीचंद पडळकर
- एसटी कर्मचाऱ्यांची अवस्था शेतकऱ्यांसारखी झालीय, कामगार आत्महत्येच्या मनस्थितीत – गुणरत्न सदावर्ते