मुंबई : विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. परंतु विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडुन आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनामध्ये ठाकरे सरकारविरोधात जोरदार घोषणेबाजी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांची वीज कापणी, आरोग्य विभाग आणि म्हाडा परीक्षेत झालेली पेपरफुटी प्रकरण आणि शेतकऱ्यांना इन्टेन्सिव्ह देण्याची घोषणा करून फसवणाऱ्या महाविकास आघाडीचा निषेध करण्यात येत आहे.
“छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जानकरांनी वाद निर्माण करू नये”
या आंदोलनामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांसह भाजपच्या सर्व नेत्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आंदोलन करत आहेत. मुख्यमंत्री आजारी असल्यानं गैरहजर असणं स्वाभाविक आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी चार्ज दुसऱ्याकडे द्यायला हवा.काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून चार्ज परत मिळणार नाही, अशी शक्यता असल्यानं किमान तो आदित्य ठाकरेंकडे तरी चार्ज द्यावा, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आदित्य ठाकरेंवरही मुख्यमंत्र्याचा विश्वास नाही वाटतं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
Read also:
- एसटी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यासाठी आणखी दोन दिवसांचा अवधी; ७० हजार कर्मचारी अजूनही संपावर ठाम
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘या’ सहकाऱ्याची ईडीकडून तब्ब्ल ८ तास चौकशी
- सतेज पाटील, हसन मुश्रिफांपाठोपाठ आता आमदार राजेश पाटीलही जिल्हा बँकेत बिनविरोध
- उपमुख्यमंत्र्यांनी दिले मेट्रो कामाचे आदेश; तरीही पुण्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे दुट्टपी राजकारण का?
- सत्ताधाऱ्याच्या चहापानाला विरोधकांचा बहिष्कार; हिवाळी अधिवेशनात वातावरण तापणार..!