कोल्हापूर : मागील काही दिवसांमध्ये कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक जाहीर करण्यात आली होती. पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील आणि इतरही दिग्ग्ज नेत्यांनी जिल्हा बँकेकरिता एकमेकांच्या सोबत तर काहींनी विरोधात शड्डू ठोकले होते.
५४ दिवसांपासून चालेलला संप अखेर मागे; लाल परी पुन्हा एकदा धावणार रस्त्यावर
मिळालेल्या माहितीनुसार, पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यापाठोपाठ आता चंदगडचे आमदार राजेश पाटील यांची जिल्हा बँकेवर बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
शिवसेनचं ठरलंय ; ‘या’ दिवशी सामील होणार युपीएत
चंदगड तालुका विकास संस्था गटातून आमदार राजेश पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. या गटात कमालीची चुरस निर्माण झालेली असताना त्यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या मोहन परब यांनी अर्ज माघारी घेतला. यात माजी आमदार महादेवराव महाडिक, आमदार पी. एन. पाटील, माजी मंत्री भरमू पाटील यांनी शिष्टाई केली आहे. आमदार पाटील यांचे वडील व माजी आमदार कै. नगरसिंगराव पाटील हे या गटातून बँकेत संचालक होते. कै. पाटील यांच्या निधनानंतर त्या जागेवर आमदार पाटील यांना संचालक करण्यात आले होते.
नगरपंचायत निवडणुकीला हिंसाचाराचं गालबोट; महाविकास आघाडी आणि भाजपा समर्थकांमध्ये तुफान हाणामारी
यावेळच्या निवडणुकीत त्यांच्यासह परशुराम पाटील, मोहन परब यांचे अर्ज छाननीनंतर शिल्लक राहीले होते. काही दिवसांपुर्वी श्री. पाटील यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे या गटातून आमदार पाटील व परब असे दोघांचे अर्ज शिल्लक राहीले होते. आमदार पाटील यांच्या पत्नी सुस्मिती यांच्यासह वीरेंद्र पाटील यांचा गोकुळच्या यंदाच्या निवडणुकीत पराभव झाला होता. ते कै. सदाशिवराव मंडलिक यांचे मेव्हणे आहेत. आता जिल्हा बनेकत बिनविरोध झाल्याने त्यांचे बळ वाढणार आहे.
Read also:
- उपमुख्यमंत्र्यांनी दिले मेट्रो कामाचे आदेश; तरीही पुण्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे दुट्टपी राजकारण का?
- सत्ताधाऱ्याच्या चहापानाला विरोधकांचा बहिष्कार; हिवाळी अधिवेशनात वातावरण तापणार..!
- “छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जानकरांनी वाद निर्माण करू नये”
- नगरपंचायतीत मोठंमोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, मतदारांचा कौल कुणाला मिळणार?
- शिरुर मतदारसंघाची अवस्था म्हणजे… “धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का”