चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सहा नगर पंचायतीसाठी आज मतदान होत आहे. यासाठी प्रशासनाची तयारी पुर्ण झाली असून ११० मतदान केंद्रातून ४२ हजार ८०९ मतदार मतदानाचा अधिकार बजाविणार आहेत. पण या दरम्यान, कोरपणा निवडणुकीला हिंसाचाराचे गालबोट लागल्याची माहिती हाती येत आहे.
हिवाळी अधिवेशनासाठी भाजपने कंबर कसली; फडणवीस म्हणातात या सरकारनं लोकशाही संपवली
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या जिल्हा महामंत्र्याचा गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. यानंतर महामंत्री डाहूलेनी यांनी पोलिसांत तक्रार केली असून काँग्रेसचे विजय बावणे, नितीन बावणे पिता पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इकंच नाहीतर त्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. तसेच, जालन्यातील बदनापूर नगरपंचायत निवडणुकीचं मतदान सुरु असतानाच दुपारच्या सुमारास दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये ही हाणामारी झाली. भाजपा नगर पंचायत निवडणुकीत बोगस मतदान करत असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी केला. वार्ड क्रमांक १२ च्या मतदान केंद्राबाहेर सांबरे यांनी हा खळबळजनक आरोप केल्यानंतर बाचाबाचीपासून सुरु झालेला गोंधळ हाणामारीपर्यंत गेला.
“भाजपचे अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात”; महापौर किशोरी पेडणेकर यांचा गौप्यस्फोट
कोरपना नगर पंचायतीच्या निवडणुकीला शेवटच्या टप्प्यात गालबोट लागले. भाजपा महामंत्री तसेच निवडणुक प्रभारी नामदेव डाहुले ह्यांच्या वाहनावर दगडफेक केल्याचा प्रकार पुढे आला आहे. या प्रकाराची पोलिसांत तक्रार दाखल झालेली आहे. पोलिसांनी तक्रारीचा आधारावर विजय बावणे, नितीन बावणे यांचावर १४३,१४७,३२३,३४१,४४७ अंतर्गत गुन्हा दाखल केला. कोरपना नगर पंचायतेत काँग्रेसचा विरोधात भाजपाने आघाडी उघळली आहे. दरम्यान आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी भाजपाने केली आहे.
शिवसेना नेत्यांना न्याय देऊ शकले नाहीत ते जनतेला काय न्याय देणार; प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल
जिल्ह्यातील सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती, सिंदेवाही-लोनवाही या सहा नगर पंचायतेसाठी आज मतदान होत आहे. यासाठी सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, कोरपना, जिवती येथे प्रत्येकी १७ मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. तर सिंदेवाही- लोनवाही येथे २५ मतदान केंद्रात मतदान होणार आहे.
आमच्या कितीही खासदारांना निलंबित करा, पण आम्ही…; संयज राऊतांचा केंद्र सरकारला इशारा
सहा नगर पंचायतेचा प्रचारात आजी-माजी पालकमंत्र्यांनी चांगलाच धुराळा उडविला होता. ही निवडणूक पालकमंत्री विजय वडेट्टीवार, माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. वडेट्टीवारांचे कार्यक्षेत्र असलेल्या सावली, सिंदेवाही-लोनवाही आणि मुनगंटीवारांचे कार्यक्षेत्र असलेल्या पोंभुर्णा नगर पंचायतेचा निवडणुकीकडे जिल्हाचे लक्ष लागले आहे.
Read also:
- ‘वाह रे MVA तेरा खेल, सस्ती दारु, महंगा तेल’, फडणवीसांची चौफेर टीका
- हिवाळी अधिवेशनासाठी भाजपने कंबर कसली; फडणवीस म्हणातात या सरकारनं लोकशाही संपवली
- राजकारणात कुणीच कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो; युतीबाबत गडकरींचे मोठे विधान
- “गुलाबराव पाटलांनी माफी मागितली, लगेच मुख्यमंत्र्यांनी माफही केले. ही नौटंकी चालणार नाही”
- पटोले दिल्लीला रवाना, विधानसभा अध्यक्षपदाबाबत हायकमांडशी चर्चा