मुंबई – विधानसभेचं हिवाळी अधिवेशन मंगळवारपासून (22 डिसेंबर) सुरु होत आहे. याच अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर सरकारने विरोधकांना चहापाण्याचे निमंत्रण दिले आहे. पण विरोधी पक्षाच्या सर्व आमदारांनी चहापाण्यावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली. “कधी नवे ते चहापाण्याचे निमंत्रण आले आहे. पण जे कुणाचेच ऐकत नाही, त्यांच्या निमंत्रणावर आम्ही सर्वांनी मिळून ठरवले आहे, आम्ही चहापाण्याच्या निमंत्रणावर बहिष्कार घालत आहोत”, असं फडणवीसांनी सांगितलं. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर चौफेर टीका केली.
“भाजपचे अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात”; महापौर किशोरी पेडणेकर यांचा गौप्यस्फोट
देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरावरुन महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. “केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचा दर प्रतिलिटर पाच आणि दहा रुपये कमी केले. त्यानंतर जवळपास 27 राज्यांनी आपला व्हॅट कमी करुन पट्रोल-डिझेलचे भाव कमी केले. पण महाराष्ट्र एकमेवर राज्य असंय ज्याने पेट्रोल-डिझेलचे भाव कमी केले नाहीत. एकीकडे सांगितलं आमच्याकडे पैसे नाहीत. तर त्याचवेळी विदेशी मद्यावरचा टॅक्स 50 टक्के कमी करण्याचं पाप या सरकारने केलं आहे. त्यामुळे हे सरकार कुणाकरता काम करते? पेट्रोल-डिझेलचे भाव कमी करत नाहीत. आणि दारुचे भाव कमी करतं. एकीकडे दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावेळी जो नारा होता तोच नारा इथे लागू होतो. वारे एमवीए तेरा खेल, सस्ती दारु, महंगा तेल, अशा प्रकारची अवस्था आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शिवसेना नेत्यांना न्याय देऊ शकले नाहीत ते जनतेला काय न्याय देणार; प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल
“ज्या घटना घडल्या नाहीत त्या घटनांची कारणं सांगून आमच्या आमदारांना सस्पेंड केलं आहे. वर्षभर सस्पेंड करण्याचं एवढचं कारण आहे की, आपल्या स्वत:च्या आमदारांवर या सरकारला विश्वास नाही. आपलं सरकार कधीही अडचणीत येऊ शकतं, असा ठाम विश्वास यांच्या मनात आहे. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या विरोधकांचे आमदार कमी करण्याचा कार्यक्रम या सरकारने केला आहे”, असं फडणवीस म्हणाले.
Read also:
- हिवाळी अधिवेशनासाठी भाजपने कंबर कसली; फडणवीस म्हणातात या सरकारनं लोकशाही संपवली
- राजकारणात कुणीच कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो; युतीबाबत गडकरींचे मोठे विधान
- “गुलाबराव पाटलांनी माफी मागितली, लगेच मुख्यमंत्र्यांनी माफही केले. ही नौटंकी चालणार नाही”
- पटोले दिल्लीला रवाना, विधानसभा अध्यक्षपदाबाबत हायकमांडशी चर्चा
- आमच्या कितीही खासदारांना निलंबित करा, पण आम्ही…; संयज राऊतांचा केंद्र सरकारला इशारा