मुंबई – गेल्या काही दिवसांपासून भाजप आमदार आशिष शेलार आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यात वाकयुद्ध सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेत शेलार यांनी मुंबई महापालिका आणि ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले होते. त्यालाच पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच भाजपचे अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.
बॉलिवूड सिने निर्माता, दिग्दर्शक करण जोहर ने आयोजित केलेल्या पार्टीत सहभागी झालेल्या सेलिब्रेटींपैकी काहींना कोरोनाची लागण झाली. यावरून शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधत त्या पार्टीत राज्य सरकारमधील मंत्री उपस्थित होता का? असा सवाल उपस्थित केला. यावर आज पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली.
अमित शाह सहकार मंत्री झाले आणि सहकार चळवळीला ताकद मिळाली; विखे पाटीलांची स्तुतीसुमने
तुम्ही आमदार झाले,मंत्री महोदय सुद्धा झाले पण जीव अद्याप महानगरपालिकेत घुटमळतोय. उगाच आरोप करु नका. लोकशाहीने अधिकार दिलाय म्हणून काहीही आरोप करु नका. लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा अपमान करु नका, असेही त्या शेलार यांना म्हणाल्या.
स्थायी समितीत 83 नगरसेवक आहेत ते काय अकार्यक्षम आहेत? आणि तुम्ही एकटे हुशार आहात का? घोटाळे घोटाळे म्हणून स्वत:चे घोटाळे लपवत राहायचे. तुमचे नगरसेवक तुमच्या कार्यपद्धतीला कंटाळले आहेत. भाजपने अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट किशोरी पेडणेकर यांनी केला आहे .
‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’चे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपा, राज्य सरकार, केंद्र सरकार, स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत आहेत. यातच शेलार म्हणाले की कारण जोहरच्या पार्टीत कोणीतरी मंत्री उपस्थित होते. पार्टीत कोणता मंत्री उपस्थित होता हे आता त्यांनी सिद्ध करून दाखवावे, असेही त्या म्हणाल्या.
Read also:
- अजित पवार यांचा निकटवर्तीय असलेला ‘हा’ नेता काँग्रेसच्या वाटेवर
- शिवसेना नेत्यांना न्याय देऊ शकले नाहीत ते जनतेला काय न्याय देणार; प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल
- आज निवडणुका झाल्या तर भाजप देशातून हद्दपार होईल; मंत्री नवाब मलिकांचा विश्वास
- आमदार, मंत्री झाला तरी महापालिकेत जीव कसा घुटमळतोय; महापौर पेंडणेकरांचा शेलारांना रोखठोक सवाल
- अमित शहांची मुख्यमंत्र्यांवर टीका, पण प्रकृती स्वास्थ्यासाठीही केली प्रार्थना…