बीड : ‘भाजप हा पक्ष राज्यातील चोरांची वरात आहे. तर, किरीट सोमय्या हे या वरातीचे बँड बाराती आहेत. माझ्या घरी सरकारी पाहुणे येणार आहेत, मी पण त्यांच्यासाठी चहा बिस्कीटे तयार ठेवली आहे. माझ्याविरोधात तपास यंत्रणांना कितीही कारवाया करायला सांगितल्या तरी मला त्याचा काहीह फरक पडणार नाही. मी कोणालाही घाबरत नाही. असे म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख कोण? उद्धव ठाकरे की अनिल परब? रामदास कदमांचा हल्लाबोल
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आज नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारार्थ बीड येथील आष्टीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात प्रचारसभेत त्यांनी आष्टीतील जनतेला संबोधित केले. भाजपाकडून राज्यातील महाविकास आघाडी सरकारविरोधात सूडबुद्धीने तपास यंत्रणांचा वापर केला जात आहे. महाराष्ट्रात एक वेगळी परस्थिती निर्माण झाली आहे. काही नेते स्वतःला राजकीय चाणक्य समजत होते. मात्र आमच्या चाणक्याने सगळ्यांना मात देऊन सरकार आणलं, असे म्हणत नवाब मलिकांनी भाजपला टोला लगावला आहे.
ठाकरे सरकारचे तिन्ही चाकं पंक्चर, फक्त धूर सोडून प्रदूषण करतंय; अमित शहांनी उडवली खिल्ली
महाराष्ट्रात कोविड सारखी परिस्थिती निर्माण झाली. पण याला जबाबदार कोण हा प्रश्न कोणी विचारत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आमची मागणी होती परदेशातील विमान बंद करा, मात्र हर्षवर्धन नावाचे मंत्री म्हणाले देशात कोरोना येणार नाही. नमस्ते टर्म देशात होणार होता त्यामुळं यांनी विमानसेवा बंद केली नाही. पण महाराष्ट्रात एकाही रुग्णांचा ऑक्सीजनविना मृत्यू नाही, असा खुसालाही त्यांनी केला.
“ज्याच्या त्याच्या कुवती प्रमाणं ते बोलले असतील”; एकनाथ खडसेंनी गुलाबराव पाटलांना दाखवला आरसा
यावेळी बोलताना त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यावरही टीका केली. अमित शहा म्हणाले निवडणुकी घ्या, मग पाहू, साहेब 6 महिन्याआधी लोकसभा निवडणूक झाली आमचीही निवडणूक घेयची तयारी आहे. आज देशात निवडणुका झाल्या तर भाजप देशातून हद्दपार होईल, अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी विरोधकांवर आसूड ओढला.
Read also:
- आमदार, मंत्री झाला तरी महापालिकेत जीव कसा घुटमळतोय; महापौर पेंडणेकरांचा शेलारांना रोखठोक सवाल
- अमित शहांची मुख्यमंत्र्यांवर टीका, पण प्रकृती स्वास्थ्यासाठीही केली प्रार्थना…
- टीईटी पेपरफुटी प्रकरण: आयुक्त तुकाराम सुपेंच्या घरी 2 कोटी रुपये कॅश आणि सोनं सापडलं
- तुम्हाला माझ्या बापाची आठवण येणार; आर. आर. पाटलांच्या मुलाच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा
- दोन महिन्यांपासून कुठय पठ्ठ्या; रावसाहेब दानवे यांची मुख्यमंत्री ठाकरेंवर एकेरी भाषेत टीका