मुंबई : भाजप नेते आशिष शेलार यांनी दिग्दर्शक करण जोहरच्या पार्टीत आघाडीतील मंत्री होता असा दावा केला होता. त्यावरून महापौर किशोरी पेडणेकर यांनी शेलारांवर जोरदार हल्ला चढवला. नुसता आरोप करू नका. पुरावे देऊन सिद्ध करा. नाही तर मुंबईकरांची माफी मागा, असं सांगतानाच आमदार, मंत्री झाला तरी तुमचा पालिकेत जीव कसा घुटमळतोय? आता जीव मोकळा कराच, असा खोचक टोला महापौर किशोरी पेडणेकर यांनी शेलारांना लगावला.
जो प्रयत्न अमरावतीत झाला तो पुन्हा झाला तर सोडायचं नाही; राज ठाकरेंचे आदेश
महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज त्यांच्या दालनात पत्रकार परिषद घेऊन आशिष शेलारांवर जोरदार हल्ला केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनावरून सर्वांना सातत्याने सतर्क राहण्यास सांगतात. महाराष्ट्र आणि कर्नाटकात सर्वाधिक कोरोना असल्याने महाराष्ट्रालाही सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, महाराष्ट्रातील भाजप नेते वेगळेच वागत असतात असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
शिवसेना पक्षप्रमुख कोण? उद्धव ठाकरे की अनिल परब? रामदास कदमांचा हल्लाबोल
करण जोहरने आयोजित केलेल्या पार्टीत सहभागी झालेल्या अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा यांच्यासह इतर आणखी चार जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्टीवरून बरेच वाद निर्माण झाल्यानंतर भाजप नेते आशिष शेलार यांनीही गंभीर आरोप केले होते. या पार्टीमध्ये राज्य सरकारमधील एक मंत्री सहभागी झाले होते असा आरोप आशिष शेलार यांनी केला होता. शेलार यांच्या या आरोपाला महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पत्रकार परिषद घेत आव्हान दिले आहे. पेडणेकर यांनी यावेळी शेलार यांच्यावर कडाडून टीकाही केली.
ठाकरे सरकारचे तिन्ही चाकं पंक्चर, फक्त धूर सोडून प्रदूषण करतंय; अमित शहांनी उडवली खिल्ली
“आम्ही शिवसेनेच्या रणरागीणी आहोत. खोटे आणि बेछुट आरोप आम्ही खपवून घेणार नाही. माझ्यावर सिंतोडे उडवले, त्याला मी बघेनच. तुमच्या आरोपांनी आणि पत्रांनी घाबरून जाणार नाही. मंत्र्यांना बदनाम करण्याचे काम सुरू असून खोटे बोलून जनतेची दिशाभूल केली जात आहे. परंतु, जनतेलासुद्धा आता तुमचा खोटारडेपणा समजला आहे. करण जोहरने आयोजित केलेल्या पार्टीत नक्की कोण मंत्री होते? याचा उलगडा करा, नाहीतर जनतेची माफी मागा,” असे आव्हानच किशोरी पेडणेकर यांनी शेलार यांना केले आहे.
Read also:
- अमित शहांची मुख्यमंत्र्यांवर टीका, पण प्रकृती स्वास्थ्यासाठीही केली प्रार्थना…
- टीईटी पेपरफुटी प्रकरण: आयुक्त तुकाराम सुपेंच्या घरी 2 कोटी रुपये कॅश आणि सोनं सापडलं
- तुम्हाला माझ्या बापाची आठवण येणार; आर. आर. पाटलांच्या मुलाच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा
- दोन महिन्यांपासून कुठय पठ्ठ्या; रावसाहेब दानवे यांची मुख्यमंत्री ठाकरेंवर एकेरी भाषेत टीका
- “ज्याच्या त्याच्या कुवती प्रमाणं ते बोलले असतील”; एकनाथ खडसेंनी गुलाबराव पाटलांना दाखवला आरसा