मुंबई – शिवसेनेचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांना बोदवड नगरपंचायत प्रचार भरसभेत डिवचलं होतं. माझ्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनीच्या गालासारखे केल्याचं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं होतं. एकनाथ खडसे यांनी गुलाबराव पाटलांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. गुलाबराव पाटील यांना नाथाभाऊंनी तीस वर्षात काय केलं हे माहिती आहे. जिल्ह्यातील लोकांना नाथाभाऊनं काय केलं हे माहिती आहे. हेमा मालिनी त्यांना का आठवली हे माझ्या लक्षातं आलं नाही. ज्याच्या त्याच्या कुवती प्रमाणं ते बोलले असतील. मी त्याची फार दखल घेत नाही, असं एकनाथ खडसे म्हणाले.
बेळगावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा अवमान; मराठी भाषिकांचा संघर्ष पेटणार, आज बंदची हाक
नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत. तिथं राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमने सामने आहेत. स्वाभाविकपणे निवडणुकीच्या ओघात केलेलं ते भाष्य आहे. गुलाबराव पाटील यांना नाथाभाऊंनी तीस वर्षात काय केलं हे माहिती आहे. जिल्ह्यातील लोकांना नाथाभाऊनं काय केलं हे माहिती आहे. ज्या वेळेस तीस वर्ष एखाद्या लोकप्रतिनिधीला लोक निवडून देतात त्यावेळी त्यानं काम केल्याशिवाय देत नाहीत. मला राजकारणात चाळीस वर्ष झाली आहेत. मी चाळीस वर्षात एकही निवडणूक हारलेलो नाही. जळगावच्या विकासकामामध्ये सर्वाधिक काम मी केलंय, असं एकनाथ खडसे म्हणाले. हेमा मालिनी त्यांना का आठवली हे माझ्या लक्षातं आलं नाही. ज्याच्या त्याच्या कुवती प्रमाणं ते बोलले असतील. मी त्याची फार दखल घेत नाही, असं एकनाथ खडसे म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अचानक रात्री विधानभवनात मारली धडक; विधानभवनाची केली पाहणी
काय म्हणाले होते गुलाबराव पाटील?
गुलाबराव पाटील यांनी बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत विरोधकावर जोरदार टीका केली. माझे तीस वर्ष राहून चुकलेल्या आमदारांना चॅलेंज आहे. त्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन पाहावं की मी काय विकास केला. हेमा मालिनीच्या गाला सारखे रस्ते मी केले. तुम्ही महाराष्ट्राला काय गुण शिकवता, असा सवाल देखील गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
Read also:
- ठाकरे सरकारचे तिन्ही चाकं पंक्चर, फक्त धूर सोडून प्रदूषण करतंय; अमित शहांनी उडवली खिल्ली
- आम्ही आगामी नगरपरिषदांमध्ये शिवसेनेचा धुव्वा उडवणार; केंद्रीय मंत्री नारायण राणेंची भीष्मप्रतिज्ञा
- “बोलण्याच्या ओघात ते वक्तव्य आले”; मनिषा कायंदेंकडून गुलाबराव पाटलांची पाठराखण
- “जर माझ्या मतदारसंघाततील हेमा मालिनी यांच्या गालासारखे नसतील तर मी राजीनामा देईन”
- हे तर दारू विकणाऱ्यांचे सरकार; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल