पुणे – गणेशोत्सवामध्ये विसर्जन मिरवणुकीस अनन्यसाधारण महत्व आहे. कोरोना आपत्तीमुळे विसर्जन मिरवणूक होत नसली, तरी भविष्यात ती पुन्हा त्याच जोमात होणार आहे़ परंतु, सध्या लकडी पुलावरून नियोजित असलेला मेट्रोचा पूल हा गणेश विसर्जन मिरवणुकीला मोठा अडथळा ठरणार आहे. संभाजी पुलावरून मेट्रोचा पुल हा गणेश विसर्जन मिरवणुकीला अडथळा ठरत असल्याने आज सभागृहात विरोधकांनी आंदोलन केल्याने कामकाज होऊ दिले नाही.
आज महापालिकेच्या मुख्य सभेत राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप, विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ , ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल , पृथ्वीराज सुतार , वसंत मोरे , साईनाथ बाबर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घोषणाबाजी करत ,आंदोलन सुरूच ठेवले आणि महापालिकेचे कामकाज ठप्प पाडले.
५४ दिवसांपासून चालेलला संप अखेर मागे; लाल परी पुन्हा एकदा धावणार रस्त्यावर
याबाबात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परिषद घेत आज महापालिकेच्या मुख्य सभेत झालेल्या गदारोळाबाबत तसेच विरोधकांनी केलेल्या आंदोलनाबाबत खेद व्यक्त केला. आज महापालिकेच्या मुख्य सभेत राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांनी घोषणाबाजी करत आणि आंदोलन करत महापालिकेचे कामकाज ठप्प पाडले हि बाब चुकीची आहे आणि राजकारण करून दिशाभूल करणारी आहे असा आरोप महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला.
मोहोळ यांनी आज पत्रकार परिषदेत मेट्रो पुलाबाबत अनेक पर्याय सुचवले. ते म्हणाले,” चार महिन्यापूर्वी या पुलाबाबत अनेक बैठक झाल्या तसेच चर्चा झाल्या देखव्यांची उंची कमी करण्यात येईल का ? या विषयावर मार्ग काढण्याचे खूप प्रयत्न झाले . विकास आणि संस्कृती या दोन्ही गोष्टींचे जतन केले पाहिजे . तसेच यावर कोणताही तोडगा निघू शकत नाही हि बाब देखील स्पष्ट केली. तसेच मेट्रोचे विषय हा राज्याचा विषय आहे पुणे महानगर पालिकेचा नसून याबाबत मेट्रोचे काम सुरु करण्याबाबत अधिकृत ठराव हा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे.”
शिवसेनचं ठरलंय ; ‘या’ दिवशी सामील होणार युपीएत
तसेच ते पुढे म्हणाले, “१३ डिसेंबर २०२१ रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेट्रो अधिकाऱ्यांसोबत बैठक मुंबईमध्ये घेतली. याबाबतचे अधिकृत पत्र देखील पालिकेकडे असून या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस संरक्षणामध्ये मेट्रोचे कामसुरु करण्याचे आदेश दिले आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी आदेश देऊन सुद्धा आज त्यांच्याच पक्षातील नेते, तसेच महाविकासाआघाडीतील नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष त्यांचे नेते सभागृहामध्ये जनतेची तसेच गणेश मंडळांची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत. तसेच स्वतःच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाचे देखील पालन करत नाही असे दिसून येत आहे.
केवळ राजकारण करून महाविकास आघाडी गणेश मंडळाची, कार्यकर्त्यांची दिशाभूल करत आहेत. तसेच दुसरीकडे शिवसेनेचे गटनेते तसेच नगरसेवक हे देखील या आंदोलनात सहभागी होते मात्र या मेट्रोचे खाते नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे तर गेल्या आठ दिवसात या नेत्यांनी आपल्या पक्ष्याच्या मान्यवरांकडे हा प्रश्न उपस्थित का नाही केला? त्यामुळे आज जे सभागृहात दुटप्पी राजकारण झाले त्याबाबत मी खेद व्यक्त करतो असे मुरलीधर मोहोळ म्हणाले.
Read also:
- सत्ताधाऱ्याच्या चहापानाला विरोधकांचा बहिष्कार; हिवाळी अधिवेशनात वातावरण तापणार..!
- “छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जानकरांनी वाद निर्माण करू नये”
- नगरपंचायतीत मोठंमोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, मतदारांचा कौल कुणाला मिळणार?
- शिरुर मतदारसंघाची अवस्था म्हणजे… “धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का”
- नगरपंचायत निवडणुकीला हिंसाचाराचं गालबोट; महाविकास आघाडी आणि भाजपा समर्थकांमध्ये तुफान हाणामारी