नवी दिल्ली : देशाच्या राजकारणात आता मोठी घडामोड घडून येणार आहे. शिवसेना ही गेल्या दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात सत्ता स्थापनकारण्यापूर्वी एनडीएमधून बाहेर पडली होती. आता हीच शिवसेना काँग्रेस पुरस्कृत युपीएत दाखल होणार आहे. एनडीएची साथ सोडल्यानंतर हे जवळपास निश्चित झाले होते की शिवसेना आता यूपीएमध्ये जाणार.
“भाजपचे अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात”; महापौर किशोरी पेडणेकर यांचा गौप्यस्फोट
यासंदर्भात शिवसेनेकडून मुहूर्तही ठरवण्यात आला आहे. शिवसेना नवीन वर्षाच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये युपीएमध्ये सहभागी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना यूपीएत सहभागी होणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे.
नगरपंचायतीच्या निवडणुकीचा नारायण राणेंना पडला विसर..
शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षाच्या नेत्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेतल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती.या बैठकीत शिवसेनेकडून खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित होते. राऊतांनी यावेळी दिल्लीमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेतली होती. या बैठकीनंतर आता शिवसेना यूपीएत कधी दाखल होणार? असा प्रश्न अनेकांनी राऊतांना विचारला होता. आता शिवसेनेच्या युपीएत सहभागी होण्याच्या कार्यक्रमासाठी सगळे नियोजन करण्यात आले आहे.
मला 50 कोटी द्या, मी घरदारासह जिल्हा सोडतो; भाजप नेत्याच भन्नाट चॅलेंज
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. राज्यात ज्याप्रकारे महाविकास आघाडीचं सरकार आहे त्याचप्रमाणे केंद्रात यूपीएचं सरकार स्थापन व्हावं यासाठी या जोरदार हालचाली सुरु आहेत. त्याचसाठी युपीएला ताकद देण्याचा काम शिवेसेनेच्या माध्यमातून होणार आहे.
Read also:
- ५४ दिवसांपासून चालेलला संप अखेर मागे; लाल परी पुन्हा एकदा धावणार रस्त्यावर
- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘या’ चार नगरपंचायतीसाठी होणार मतदान; राणे विरुद्ध शिवसेना नेतृत्वाचा लागणार कस
- ‘राष्ट्रपती राजवट लागण्यासाठीची कोणतीही कारणे राज्य सरकारने शिल्लक ठेवली नाहीत’
- गुलाबराव पाटलांच्या ‘त्या’ विधानावर हेमा मालिनी भडकल्या, म्हणाल्या..
- “टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात यावी”; देवेंद्र फडणवीस यांची मागणी