सिंधुदुर्ग – रविवारी नगरपंचायतीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचारसभेत नारायण राणे यांनी सी वर्ल्डवरून सत्ताधाऱ्यांवर जाहीर टीका केली. तसेच भाजपाच्या उमेदवारांना निवडून देण्यासाठी मतदारांना भावनिक आवाहनही केले. जिल्ह्याचा पूर्ण विकास होईपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली. राणे यांनी भाषणात मतदारांना भावनिक आवाहन केले, तर ही निवडणूक नगरपंचायतीची आहे, याचा त्यांना विसर पडल्याचे दिसून आले. “मी राजकीय भाषण करणार नाही. पण हा जिल्हा माझे कुटुंब आहे. मी तुमच्याच घरातला एक आहे. म्हणून भावनिक वृत्तीने, आदराच्या भावनेतून तुमचे माझे संबंध राजकर्ता म्हणून नाहीत.
माजी आमदार विलास लांडे यांची पुन्हा शिरुर लोकसभेच्या मैदानात ‘बारी’
तुम्ही मला दादा म्हणता तेव्हा मी भारावून जातो.” असे नारायण राणे भाषणात म्हणाले. मी जिवंत असेपर्यंत, कितीही प्रयत्न केले तरी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही, अशी भावना व्यक्त करत तुम्ही मला फक्त १३ आमदार द्या. तुमचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. मी सिंधुदुर्ग जिल्हा उद्योगमय करणार आहे. मला गरीब शब्दच आवडत नाहीत. त्यामुळे लोकांनी कष्टाला बुद्धीची जोड देऊन व्यवसाय करावा. त्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचेही राणे म्हणाले.
दरम्यान, नारायण राणे यांनी सी वर्ल्डवरून सत्ताधाऱ्यांवर जाहीर टीका केली. सिंधुदुर्गात सी वर्ल्ड सुरू झाले असते तर जगभरातून लोक सी वर्ल्ड पाहण्यासाठी जिल्ह्यात आले असते. दोन ‘फाईव्ह स्टार’ हॉटेल उभी राहणार होती. त्या ‘फाईव्ह स्टार’मध्ये अनेक तरुण-तरुणींना नोकऱ्याही मिळाल्या असत्या. पण सरकारच्या तिजोरीत १०० कोटी राखून ठेवले होते. पैसे खर्च केले आणि सी वर्ल्ड कॅन्सल केला, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.
Read also:
- “भाजपचे अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात”; महापौर किशोरी पेडणेकर यांचा गौप्यस्फोट
- अजित पवार यांचा निकटवर्तीय असलेला ‘हा’ नेता काँग्रेसच्या वाटेवर
- शिवसेना नेत्यांना न्याय देऊ शकले नाहीत ते जनतेला काय न्याय देणार; प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल
- आज निवडणुका झाल्या तर भाजप देशातून हद्दपार होईल; मंत्री नवाब मलिकांचा विश्वास
- आमदार, मंत्री झाला तरी महापालिकेत जीव कसा घुटमळतोय; महापौर पेंडणेकरांचा शेलारांना रोखठोक सवाल