नवी दिल्ली – माझ्या मतदारसंघातील रस्ते अभिनेत्री हेमा मालिनीच्या गालासारखे आहेत, असं विधान राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं होतं. गुलाबराव पाटलांच्या या विधानावर भाजपने जोरदार आक्षेप घेतला होता. आता भाजपच्या खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांनीही या विधानावर संताप व्यक्त केला आहे. सामान्य लोक बोलतात समजू शकतो. पण संसदीय राजकारणातील लोकांनी असं विधान करू नये, अशी प्रतिक्रिया हेमा मालिनी यांनी व्यक्त केली आहे.
…तेव्हा फडणवीसचं मुख्यमंत्री होतील असं ठरलं होतं, शिवसेनेनेच सत्तेसाठी वचन मोडले – अमित शहा
हेमा मालिनी यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मी माझे गाल चांगले ठेवत असते म्हणून कदाचित बोलले असतील. हरकत नाही. हा विनोदाचा भाग सोडा. मला वाटतं त्यांना काही वाटलं असेल म्हणून बोलले. काही वर्षांपूर्वी लालूंनी असं विधान केलं होतं. त्यानंतर अनेकांनी तसंच बोलायला सुरुवात केली. पण अशा प्रकारची कमेंट करणं योग्य नाही. सामान्य लोकांनी बोलणं वेगळं. पण संसदीय राजकारणातील व्यक्तीने असं विधान करू नये. कोणत्याही स्त्रीबाबत असं विधान केलं जाऊ नये, असं हेमा मालिनी म्हणाल्या.
देवेंद्र फडणवीसांमधील संयम हा गुण शिकण्यासारखा; पंकजामुंडेचे फडणवीसांविषयी स्तुतीसुमने
गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणाले?
जळगाव येथे बोदवड नगरपंचायतीच्या प्रचार सभेत विरोधकांवर टीका करताना आणि आपल्या कामाची माहिती देताना गुलाबराव पाटील यांनी हे विधान केलं होतं. माझे तीस वर्ष राहून चुकलेल्या आमदारांना चॅलेंज आहे. त्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन पाहावं की मी काय विकास केला. हेमा मालिनीच्या गाला सारखे रस्ते मी केले. तुम्ही महाराष्ट्राला काय गुण शिकवता, असा सवाल पाटील यांनी केला होता.
Read also:
- “टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी सीबीआय चौकशी करण्यात यावी”; देवेंद्र फडणवीस यांची मागणी
- मला 50 कोटी द्या, मी घरदारासह जिल्हा सोडतो; भाजप नेत्याच भन्नाट चॅलेंज
- नगरपंचायतीच्या निवडणुकीचा नारायण राणेंना पडला विसर..
- “भाजपचे अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात”; महापौर किशोरी पेडणेकर यांचा गौप्यस्फोट
- अजित पवार यांचा निकटवर्तीय असलेला ‘हा’ नेता काँग्रेसच्या वाटेवर