मुंबई – राज्यात सध्या टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरण गाजत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही यावरून आक्रमक झालेत. टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपेकडे 88 लाख रुपये सापडल्यानंतर आज आणखी 2 कोटी रुपये रोख आणि सोने सापडले. म्हाडाच्या परीक्षेत गैरप्रकार करणार्या जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीला अभय याच तुकाराम सुपेंनी दिले. काळ्या यादीतील या कंपनीला त्यांनीच 3 महिन्यात बाहेर काढले. असे ट्विट करत फडणवीसांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
उद्धव ठाकरेत हिम्मत असेल तर राजीनामा द्यावा, अन्…; अमित शहांच मुख्यमंत्र्यांना खुलं आव्हान
फडणवीसांनी ट्विट करत आरोप करताना म्हटले आहे की, आता या जीए सॉफ्टवेअरचे संचालक डॉ. प्रीतिश देशमुखकडे पोलिस भरतीची ओळखपत्र सापडली आहेत. म्हणजे आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी, पोलिस भरती हे सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी दिसताहेत. या सर्व घोटाळ्यातील गुंतागुंत पाहता सीबीआय चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आता या जीए सॉफ्टवेअरचे संचालक डॉ. प्रीतिश देशमुखकडे पोलिस भरतीची ओळखपत्र सापडली आहेत.
म्हणजे आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी, पोलिस भरती हे सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी दिसताहेत.
या सर्व घोटाळ्यातील गुंतागुंत पाहता सीबीआय चौकशी व्हायलाच हवी ❗️#ExamScam #Maharashtra #MVA— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 20, 2021
सीबीआय चौकशी झाली तरच या घोटाळ्यांमधील मंत्रालयातील धागेदोरे उघड होतील, अन्यथा वसुलीचे हे आणखी एक प्रकरण कधी उजेडात येणारच नाही. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, लाखो विद्यार्थ्यांना वेठीस धरणार्या खर्या गुन्हेगारांचा शोध घ्यायचा असेल तर हे प्रकरण सीबीआयला सोपवा. असे म्हणत फडणवीसांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
सीबीआय चौकशी झाली तरच या घोटाळ्यांमधील मंत्रालयातील धागेदोरे उघड होतील, अन्यथा वसुलीचे हे आणखी एक प्रकरण कधी उजेडात येणारच नाही. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की,लाखो विद्यार्थ्यांना वेठीस धरणार्या खर्या गुन्हेगारांचा शोध घ्यायचा असेल तर हे प्रकरण सीबीआयला सोपवा ❗️#ExamScam
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 20, 2021
Read also:
- मला 50 कोटी द्या, मी घरदारासह जिल्हा सोडतो; भाजप नेत्याच भन्नाट चॅलेंज
- नगरपंचायतीच्या निवडणुकीचा नारायण राणेंना पडला विसर..
- “भाजपचे अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात”; महापौर किशोरी पेडणेकर यांचा गौप्यस्फोट
- अजित पवार यांचा निकटवर्तीय असलेला ‘हा’ नेता काँग्रेसच्या वाटेवर
- शिवसेना नेत्यांना न्याय देऊ शकले नाहीत ते जनतेला काय न्याय देणार; प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल