मुंबई : मागील दीड महिन्यांपासून महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. एसटीच्या संपामुळे सर्वसामान्य जनतेचे कमालीचे हाल झाल्याचे पाहायला मिळत आहे. एसटीचे विलगीकरण आणि पगारवाढ या मुद्यांवर एसटीचे कर्मचारी आझाद मैदानात ठाण मांडून बसले आहेत.
शिरुर मतदारसंघाची अवस्था म्हणजे… “धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का”
एसटीच्या संपावर तोडगा म्हणून परिवहनमंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांसाठी ऐतिहासिक पगारवाढीची घोषणा केली होती. मात्र अद्यापही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, आणि अजय गुजर यांच्यात एक बैठक झाली होती. यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेवून संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. याच संघटनेच्या नोटीसीनंतर हा संप सुरु झाला होता. मात्र आता संपावर ऍड. गुणरत्न सदावर्ते यांनी ताबा मिळवला आहे. अजय गुजर यांना शुभेच्छा देऊन त्यांनी संप सुरूच राहणार अशी भूमिका सदावर्ते यांनी घेतल्याने आता संप सुरूच राहणार आहे.
नगरपंचायतीत मोठंमोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, मतदारांचा कौल कुणाला मिळणार?
आझाद मैदानात आता पुन्हा एकदा संपकरी आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. संप मागे घेण्याची घोषणा महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेने केल्यावर आणि कारवाई मागे घेण्याचे आश्वासन एसटी महामंडळाने दिल्यानंतरही मंगळवारी ६८ हजार कर्मचारी संपावर होते. कामावर परतण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना दोन दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली असून अन्यथा पुन्हा कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान, बुधवारी उच्च न्यायालयात अवमान याचिकेवर सुनावणी होणार आहे.
Read also:
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘या’ सहकाऱ्याची ईडीकडून तब्ब्ल ८ तास चौकशी
- सतेज पाटील, हसन मुश्रिफांपाठोपाठ आता आमदार राजेश पाटीलही जिल्हा बँकेत बिनविरोध
- उपमुख्यमंत्र्यांनी दिले मेट्रो कामाचे आदेश; तरीही पुण्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे दुट्टपी राजकारण का?
- सत्ताधाऱ्याच्या चहापानाला विरोधकांचा बहिष्कार; हिवाळी अधिवेशनात वातावरण तापणार..!
- “छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जानकरांनी वाद निर्माण करू नये”